Solapur: चेंबरमध्ये पडून स्मशानभूमीत काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू
By संताजी शिंदे | Updated: July 12, 2024 19:04 IST2024-07-12T19:04:00+5:302024-07-12T19:04:21+5:30
Solapur News: नैसर्गीक विधीला गेलेल्या महिलेचा पाय घसरून ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. हा दुर्देवी प्रकार शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.

Solapur: चेंबरमध्ये पडून स्मशानभूमीत काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू
- संताजी शिंदे
सोलापूर - नैसर्गीक विधीला गेलेल्या महिलेचा पाय घसरून ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. हा दुर्देवी प्रकार शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. मंगल उर्फ पिंकी पिंटू कांबळे (वय ३३ रा. जुना पुना नाका स्मशानभूमी जवळ, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगल कांबळे या धुनी भांडी करून स्वत:चा उदरनिर्वाह करतात. दोन मुलांसह त्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या जागेत राहतात. दुपारी त्या नैसर्गीक विधीसाठी स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या उघड्या चेंबरपासून जात होत्या. दरम्यान त्यांचा चालताना तोल गेला व त्या आतमध्ये पडल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारसायकलवरील व्यक्तीने हा प्रकार पाहिला. त्याने तेथे रहात असलेल्या त्यांच्या घरातील नातेवाईकांना याची कल्पना दिली.
मंगल कांबळे यांचा शोध घेतला मात्र त्या चेंबरमध्ये दिसून येत नव्हत्या. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले, त्यांनी चेंबरमधील पंम्पींग मोटारने बाहेर काढले तेव्हां महिला आत आल्याचे निदर्शनास आले. महिलेस बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. याची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली आहे.