Solapur : ऐकलं का ? उजनी धरण क्षेत्रात पाऊस नाहीच; उजनी धरणाची पाणीपातळी वजा ३४ टक्के

By Appasaheb.patil | Published: July 20, 2023 03:16 PM2023-07-20T15:16:20+5:302023-07-20T15:16:44+5:30

Solapur: राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून नदी, नाले ओसांडून वाहत आहेत.

Solapur: Did you hear? There is no rain in Ujani dam area; The water level of Ujani Dam is minus 34 percent | Solapur : ऐकलं का ? उजनी धरण क्षेत्रात पाऊस नाहीच; उजनी धरणाची पाणीपातळी वजा ३४ टक्के

Solapur : ऐकलं का ? उजनी धरण क्षेत्रात पाऊस नाहीच; उजनी धरणाची पाणीपातळी वजा ३४ टक्के

googlenewsNext

- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून नदी, नाले ओसांडून वाहत आहेत. अनेक शहरांचे जीवन विस्कळीत झाले असून काही शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, उजनी धरण क्षेत्रात अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत मागील आठ दिवसात कोणतीच वाढ झाल्याचे पहावयास मिळत नाही. सध्या उजनीच्या पाण्याची पातळी वजा ३४ टक्के इतकी आहे.

पुणे जिल्ह्यात अन् उजनी धरण परिसरात पाऊस पडला तरच उजनीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. उजनीची पाणीपातळी वाढल्यास सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. मात्र धरणात मागील काही दिवसांपासून पाण्याची पातळी वाढत नसल्याचे दिसून येत असताना शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापुरात आज गुरूवार सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. काल सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात २२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या १२ हजार क्सुसेक वेगानं दौण्डमधून विसर्ग येत असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Solapur: Did you hear? There is no rain in Ujani dam area; The water level of Ujani Dam is minus 34 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.