सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीसाठी १ हजार ९१५ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:23 PM2018-09-14T18:23:18+5:302018-09-14T18:25:58+5:30
६१ ग्रामपंचायत निवडणुक : ४ सरपंच २७ सदस्यांची अर्ज अवैध
सोलापूर : जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियाला वेग आला आहे. सरपंचपदासाठी ३३४ अर्ज तर १ हजार ६१२ जणांनी सदस्यपदासाठी अर्ज केला होता. अर्ज छाननीच्या वेळी ४ सरपंचपदाचे व २७ सदस्यांचे असे एकुण ३१ जणांचे अवैध ठरले आहेत. या ग्रामंपचायतीसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचयातीच्या निवडणुकीस प्रारंभ झाला असून सरपंच पदाकरीता ३३० उमेदवार तर सदस्यपदासाठी १ हजार ५८५ जणांत रिगाणात उभे आहेत. अर्ज छाननीच्या वेळी सरपंचपदासाठी करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी आलेल्या अर्जापैकी एका अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर मंगळवेढा तालुक्यातील १२ ग्रामपंचयातीची सरपंचपदासाठी एकाचा अर्ज अवैध ठरला. तसेच अक्कलकोट तालुक्यातील १३ ग्रामंपचायत सरपंचपदासाठी ५० जणांचे अर्ज आले होते. त्यातील दोघांचे अर्ज अवैध ठरले. करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचयात सदस्यांसाठी ४४ जणांनी अर्ज केला, त्यातील एका अर्ज बाद झाला.
पंढरपुर तालुक्यातील ४ ग्रामपंचायत सदस्या करीता १३४ जणांनी अर्ज केले त्या मधील चौघांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. माळशिरस तालुक्यातील ९ ग्रामपंचात सदस्यासाठी ५६ जणांनी अर्ज केला, छाणीच्या वेळी दोघांचे अर्ज अवैध ठरले. सांगोला तालुक्यतील ६ ग्रामंपचायत सदस्यपदाकरीता २०५ जणांनी अर्ज केला मात्र त्यातील तिघांचे अर्ज अवैध, मंगळवेढा तालुक्यातील १२ ग्रामपंचायत सदस्यासाठी ३८१ जणांनी अर्ज केला, छाणणी दरम्यान तिघांचे अर्ज बाद झाले. दक्षिण सोलापूर मधुन तिघांचे अर्ज अवैध ठरले. अक्कलकोट तालुक्यातील १३ ग्रामपंचायत सदस्याठी ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यातील २ दोघांचे अर्ज अवैध ठरले. या ६१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.