सोलापूर जिल्हा बँकेपाठोपाठ दूध संघही तोट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 06:09 PM2017-09-19T18:09:45+5:302017-09-19T18:10:38+5:30
आधी दूध आईचे मग दूध पंढरीचे अशा घोषवाक्यांमुळे घराघरात पोहोचलेला सोलापूर जिल्हा सहकारी संघ (दूध पंढरी) मागील आर्थिक वर्षात प्रथमच तोट्यात आला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १९: आधी दूध आईचे मग दूध पंढरीचे अशा घोषवाक्यांमुळे घराघरात पोहोचलेला सोलापूर जिल्हा सहकारी संघ (दूध पंढरी) मागील आर्थिक वर्षात प्रथमच तोट्यात आला आहे. शेतकºयाची बँक म्हणून ओळख असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक संकटात असताना जिल्हा लेबर फेडरेशन मात्र चार वर्षांनंतर नफ्यात आले आहे.
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस नेत्यांची सत्तास्थाने म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, लेबर फेडरेशन व जिल्हा परिषद ओळखली जातात. बहुतकरुन या संस्थांवर प्रतिनिधित्व करणाºयानाच पुढे विधानसभा, विधान परिषद व लोकसभेवरही नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आज यापैकीच जिल्हा बँक व जिल्हा दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे असलेल्या कर्जाची वसुलीच होत नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आली आहे. बँकेला १६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल ६१ कोटी ५५ लाख रुपये एवढा तोटा झाला आहे. शेतकºयांकडील व नेतेमंडळीकडील कर्जाच्या थकबाकीसाठी एन.पी.ए.साठी रक्कम टाकली आहे.
नेतेमंडळींनीच थकविलेल्या कर्जामुळे आज जिल्हा बँक अडचणीत असली तरी वसुली झाली तर उद्या बँक पुन्हा सुुस्थितीत येऊ शकते; मात्र सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ अडचणीतून बाहेर येण्याची शक्यता दिसत नाही. कारण दूध पंढरीला ७ कोटी १२ लाख ४९ हजार ५९९ रुपये इतका तोटा झाला आहे. संघाच्या १६-१७ च्या वार्षिक अहवालात ही बाब नमूद केली आहे. एकीकडे जिल्हा बँक व जिल्हा दूध संघ तोट्यात असताना जिल्हा लेबर फेडरेशन तोट्यातून नफ्यात आले आहे. २०१२-१३ पासून सलग चार वर्षे तोट्यात असलेल्या लेबर फेडरेशनला यावर्षी तीन लाख ९ हजार २०९ रुपये इतका नफा झाला आहे. मागील चार वर्षे फेडरेशनला तब्बल ४४ लाखांचा तोटा झाला होता.
-----------------------------
अधिक दर दिल्याने फटका
संघाच्या मागील आर्थिक वर्षाच्या अहवालात स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाºयांना एक कोटी ६९ लाख रुपये तसेच घसारा तरतूद दोन कोटी ४३ लाख रुपये अशी चार कोटी १२ लाख रुपये तर दुधाला अधिक दर दिल्याने असा एकूण ७ कोटी १२ लाख ४९ हजार ५९९ रुपये इतका तोटा झाल्याचे म्हटले आहे. शेतकºयांना शासन दरापेक्षा अधिक दर दिल्याने तोटा वाढल्याचे दूध संघाकडून सांगण्यात आले. च्जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांची संख्या २२० होती ती सध्या २१६ इतकी असून या आर्थिक वर्षांत ही संख्या आणखीन कमी होणार आहे.