कर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 09:10 AM2018-09-26T09:10:30+5:302018-09-26T09:12:01+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँक : शेतीकर्ज थकबाकीवर ३२५ कोटींची एनपीएमध्ये तरतूद

Solapur district bank due to debt waiver ... still lose | कर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा

कर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा

Next
ठळक मुद्देसंचालक मंडळाची संबंधित युनिटकडे ९५० कोटी रुपये इतकी थकबाकी मागील वर्षी ३१ टक्के असलेला एनपीए या आर्थिक वर्षात ३९ टक्के झाला थकबाकीमुळे बँक अधिक आर्थिक अडचणीत आली

सोलापूर : राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजाणी करण्यासाठी मिळालेल्या ४२६ कोटी रूपयांतून  सोलापूर जिल्हा बँकेने आपली देणी भागविल्यामुळे आर्थिक वर्ष सन २०१६ - १७ मध्ये  ६१ कोटी ५५ लाख रुपये तोट्यात असलेली जिल्हा बँक यावर्षी काहीशी सावरली आहे. मात्र शेतीकर्जाच्या थकबाकीपोटी ३२५ कोटींची ‘एनपीए’साठी तरतूद करावी लागली, अशी माहिती बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी दिली.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक यावर्षी सावरली ती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे. मागील वर्षात बँकेला ६१ कोटी ५५ लाख रुपये तोटा झाला होता. यावर्षी  बँकेला कर्जमाफीचे ४२६ कोटी रुपये शासनाकडून आले. यामध्ये जवळपास ५७ कोटी रुपये नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपोटी दिले आहेत. यावर्षी बँकेला व्यावसायिक नफा ३ कोटी ७८ लाख रुपये झाला असला तरी शेती व बिगरशेतीच्या थकबाकीवर एनपीएत तरतूद केल्याने बँकेचा तोटा २७ कोटी ५४ लाख १५ हजार रुपये झाला आहे. शेती कर्जावरील थकबाकीवर मागील वर्षी २६१ कोटी तरतूद केली होती.

 ती यावर्षी ३२५ कोटी एवढी केली आहे. शेती कर्जावर मागील वर्षीपेक्षा ६३ कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद करावी लागल्याने २४.४३ टक्के एनपीएत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. बिगरशेतीसाठीच्या थकबाकीवर मागील वर्षीपेक्षा अवघ्या ५ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे किसन मेटे यांनी सांगितले.
शासनाकडून पैसा येण्यास विलंब...

  • - जून २०१७ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे शासनाकडून ६३ कोटी ९७ लाख रुपये अद्यापही मिळाले नाहीत. ही रक्कम बँकेला मिळाली असती तर बँकेचा एनपीए कमी झाला असता असे बँकेचे माजी अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले. कर्जमाफी जाहीर करुन १५ महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून पैसे येण्यास विलंब होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

एनपीए ३९ टक्क्यांवर..
- संचालक मंडळाची संबंधित युनिटकडे ९५० कोटी रुपये इतकी थकबाकी असून ती वरचेवर वाढतच आहे. शेतकºयांकडील थकबाकीही वरचेवर वाढत असल्याने बँकेचा एनपीए मागील वर्षीच्या तुलनेत वाढला आहे.  मागील वर्षी ३१ टक्के असलेला एनपीए या आर्थिक वर्षात ३९ टक्के झाला आहे. थकबाकीमुळे बँक अधिक आर्थिक अडचणीत आली असती मात्र कर्जमाफीची रक्कम बँकेला मिळाल्याने बँक काहीअंशी सावरली आहे. 

Web Title: Solapur district bank due to debt waiver ... still lose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.