सोलापूर जिल्हा बँकेची १० दिवसांत झाली १६ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:30 PM2018-06-14T14:30:17+5:302018-06-14T14:30:17+5:30
संपूर्ण रक्कम शेतकºयांनाच कर्जाच्या माध्यमातून वाटप केली जात असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अविनाश देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर: बिगर शेतीचे ५ कोटी व शेतीची १० कोटी ९९ लाख ५५ हजार अशी १६ कोटी रुपयांची वसुली मागील १० दिवसात झाली असून ही संपूर्ण रक्कम शेतकºयांनाच कर्जाच्या माध्यमातून वाटप केली जात असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अविनाश देशमुख यांनी सांगितले.
एक जूनपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक म्हणून देशमुख हे कामकाज पाहत असून वसुलीवर व आलेली रक्कम शेतकºयांनाच वाटण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. बिगर शेतीचे ५ कोटी रुपये वसूल झाले असून शेतकºयांकडून जवळपास ११ कोटी रुपये वसूल झाले आहेत. जसे पैसे येतील तसे शेतकºयांना कर्जाच्या माध्यमातून वाटप केले जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप हंगामासाठी ११ जूनपर्यंत ७९ कोटी ४४ लाख २५ हजार रुपयांचे वाटप केले आहे. राष्ट्रीय, खासगी तसेच जिल्हा व विदर्भ कोकण अशा ३२ बँकांनी खरीप हंगामासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या २० टक्के कर्ज वाटप केले असून त्यामध्ये जिल्हा बँकेचा वाटा २७:९० टक्के इतका असल्याचे सांगण्यात आले.
२१ हजार शेतकºयांना कर्जवाटप
- - खरिपासाठी सर्व बँकांनी आतापर्यंत २१ हजार १७४ शेतकºयांना २८२ कोटी ८८ लाख ९० हजार रुपये इतके कर्ज वाटप केले आहे.
- - स्टेट बँक आॅफ इंडियाने ३५५८ शेतकºयांना ६६ कोटी ९५ लाख, बँक आॅफ इंडियाने ४ हजार १७२ शेतकºयांना ४८ कोटी ४० लाख रुपये कर्ज वाटले आहे.
- - जिल्हा मध्यवर्ती बँकेने वाटप केलेल्या ८ हजार ३४६ कर्जदारांमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेले ६ हजार ५५६ शेतकरी तर कर्ज भरणारे उर्वरित शेतकरी आहेत.
- विजय शुगर: कोणी इच्छुक दिसेना
- जिल्हा मध्यवर्ती बँकेने ताबा घेतलेल्या करकंब येथील विजय शुगर या साखर कारखान्याचे मूल्यांकन १२५ कोटी रुपये झाले असून याच्या लिलावासाठी तिघे निविदा घेऊन गेले होते. पैकी कोणीही निविदा भरली नसल्याने पुन्हा निविदा मागविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.