सोलापूर जिल्हा बँकेने केले दोघांचे निलंबन,एकाने केला अपहार तर दुसºयाने केली पदाधिकाºयांची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:31 AM2017-12-12T11:31:24+5:302017-12-12T11:34:43+5:30
पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १२ : पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे. मागील वर्षभरात अनेक कर्मचारी स्वत:हून राजीनामा देऊन निघून गेले आहेत.
बँकेच्या संचालकांनी स्वत:च्या कारखाने, शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांसाठी घेतलेले कर्ज न भरल्याने बँक आर्थिक अडचणीत आली आहे. हे कर्ज वसूल होत नसल्याने संचालकच अडचणीत असल्याने अनेक सचिव व कर्मचाºयांनी इतरांना पाहिजे तसे कर्ज वाटप केले आहे. यामुळे एकूणच बँकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचारी किंवा विकास सोसायट्यांचे सचिव थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. या उलट बँकेची बदनामी करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. असाच प्रकार बँकेच्या मुख्यालयातील ज्युनियर अधिकारी एम. व्ही. ताठे यांनी केला होता. ताठे यांनी ११ नोव्हेंबर रोजी बँकेचे अध्यक्ष व पदाधिकाºयांविरोधात मोबाईल व्हॉट्सअॅपवर अशोभनीय मेसेज पाठविला होता. बँकेने १३ नोव्हेंबर रोजी नोटीस दिल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या खुलाशात मानसिक स्थिती बिघडल्याने असा प्रकार झाल्याचे म्हटले होते. खुलासा अमान्य करीत ताठे यांच्यावर बँकेने निलंबनाची कारवाई केली. करमाळा शाखेत रोखपाल म्हणून कार्यरत असताना आर. के. साळुंखे खाते उघडण्यासाठी ४७ ग्राहकांकडून प्रत्येकी १०० रुपये घेतले. मात्र ही रक्कम बँकेत जमा केली नाही. १८ आॅगस्टला यापैकी तीन हजार रुपये भरणा केला. उर्वरित रक्कम भरणा केली नाही, शिवाय भरणा केलेली रक्कमही वापरून नंतर भरली. यामुळे साळुंखे यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली आहे.
जिल्हा बँकेने गेल्या वर्षभरात बेफिकीर अनेक कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. यामुळे काहींनी राजीनामा देऊन बँकेला बायबाय केला आहे.
----------------
कर्मचाºयांनी वसुलीवर भर द्यावा
- बँकेच्या कर्मचाºयांनी आता वसुलीवर भर दिला पाहिजे. बँक कर्मचारी व विकास सोसायट्यांच्या सचिवांना पुढील महिन्यात वसुलीची जबाबदारी दिली जाणार आहे. घरबसल्या आलेली वसुली दाखवून नव्याने कर्ज वाटप करणे हेच केवळ कर्मचाºयांचे काम नाही. वसुलीसाठी खातेदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. असे होत नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आमच्यापैकी कोणताही संचालक वसुली करु नका, असे सांगत नसल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले.