जलयुक्तनंतरमागेल त्याला शेततळे योजनेत सोलापूर जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:00 PM2018-03-21T12:00:40+5:302018-03-21T12:00:40+5:30
कृषी विभागाची कामगिरी यशस्वी , जिल्ह्यात ४५०० शेततळी पूर्ण, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र माने यांची माहिती
सोलापूर : जलयुक्त शिवार योजनेत राज्यात अग्रेसर राहिलेल्या सोलापूर जिल्ह्याने मागेल त्याला शेततळे योजनेच्या परिपूर्ण अंमलबजावणीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात ४५०० शेतकºयांना शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. यातून १९ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र माने यांनी दिली.
माने म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजना फेब्रुवारी २०१६ ला सुरु झाली. याअंतर्गत शेततळ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. ०.६० हेक्टरपेक्षा जास्त जमीनधारक शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थ्यांची निवड करताना दारिद्र्यरेषेखालील किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकºयांना प्राधान्य दिले जाते. जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ज्येष्ठतेनुसार प्रथम येणाºयास प्राधान्य दिले जाते.
सोलापूर जिल्ह्याला ८००० शेततळ्यांचे उद्दिष्ट शासनाने दिले. शेतकºयांनी योजनेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद दिला. योजनेंतर्गत दोन वर्षांत २४ हजार १६८ अर्ज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले होते. त्यापैकी १६ हजार १८४ अर्जांना मंजुरी देण्यात आली. यातील १५ हजार २२८ कामांना मंजुरी आदेश देण्यात आला.
निकषानुसार पडताळणी करून एकूण ८ हजार १२१ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली. त्यापैकी ४ हजार ६२४ शेततळे बांधून पूर्ण झाली असून, त्यापैकी ४ हजार ४८५ शेततळ्यांना एकूण १९ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले, असे माने यांनी सांगितले.
सांगोला तालुका शेततळे बांधण्यात अग्रेसर
च्परंपरेने दुष्काळी असलेला सांगोला तालुका शेततळे बांधण्यात अग्रेसर आहे. सांगोला येथे पहिल्या वर्षी ३६५ तर दुसºया वर्षी ४५० अशी एकूण ८१५ शेततळी बांधण्यात आली. खालोखाल पंढरपूर व मंगळवेढा तालुके अनुक्रमे ७५८ आणि ५३८ शेततळ्यांसह दुसºया आणि तिसºया क्रमांकावर आहे.