सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ११३ कोटींचे कर्ज थकीत, मागील कर्जमाफीचे १७ हजार लाभार्थी पुन्हा थकबाकीदार

By Admin | Published: June 23, 2017 02:26 PM2017-06-23T14:26:01+5:302017-06-23T14:26:01+5:30

-

Solapur District Central Bank exceeds loan of Rs 113 crore, 17,000 beneficiaries of previous loan waiver again | सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ११३ कोटींचे कर्ज थकीत, मागील कर्जमाफीचे १७ हजार लाभार्थी पुन्हा थकबाकीदार

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ११३ कोटींचे कर्ज थकीत, मागील कर्जमाफीचे १७ हजार लाभार्थी पुन्हा थकबाकीदार

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : २००७-०८ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यापैकी १७ हजार २३ शेतकरी खातेदार पुन्हा थकबाकीदारांच्या यादीत असून त्यांच्याकडे ११३ कोटी २१ लाख ७३ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही माहिती शासनाला सादर केली आहे.
राज्याच्या सहकार खात्याने ही विविध प्रकारची माहिती राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांना मागितली आहे. यामध्ये २००७-०८ मध्ये कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी किती शेतकरी सध्या थकीत आहेत?, याचीही माहिती मागितली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ती सहकार खात्याला सादर केली आहे. मागील कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी पुन्हा त्याच शेतकऱ्यांची थकबाकी वाढली असल्याचे बँकेच्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे. त्याच शेतकऱ्यांची थकबाकी सर्वाधिक बार्शी तालुक्यात वाढली असून, एकट्या बार्शी तालुक्यात २९२५ शेतकऱ्यांकडे २२ कोटी २४ लाख ३ हजार रुपये थकले आहेत. पंढरपूर तालुक्यातील २४४२ शेतकऱ्यांकडे १८ कोटी ६० लाख १९ हजार रुपये पुन्हा थकले आहेत. माढा तालुक्यातील १५७९ शेतकऱ्यांकडे १४ कोटी ६५ लाख ६३ हजार रुपये इतकी रक्कम थकीतमध्ये गेली आहे. अक्कलकोट तालुक्यातील मागच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले १८२६ शेतकरी १२ कोटी ८१ लाख ६२ हजार रुपये थकवून कर्जमाफीच्या यादीत आले आहेत.
माळशिरस तालुक्यातील १७७७ शेतकऱ्यांकडे ९ कोटी ४५ लाख २८ हजार, करमाळा तालुक्यातील १८८७ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६७ लाख २९ हजार, मंगळवेढा तालुक्यातील १३८४ शेतकऱ्यांकडे ७ कोटी एक लाख २७ हजार, सांगोला तालुक्यातील ११४३ शेतकऱ्यांकडे ५ कोटी ६६ लाख ७० हजार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६२१ शेतकऱ्यांकडे ५ कोटी एक लाख ७० हजार, मोहोळ तालुक्यातील ८५४ शेतकऱ्यांकडे ४ कोटी ६३ लाख ९७ हजार तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ५८५ शेतकऱ्यांकडे चार कोटी ४४ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी आहे.
-------------------
२७० कोटींची कर्जमाफी.........
च्२००७-०८ मध्ये शासनाने कर्जमाफी केली होती त्यावेळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४४ हजार ३०० शेतकऱ्यांचे २७० कोटी ३७ लाख ६६ हजार रुपये इतके कर्ज माफ झाले होते. यामध्ये पंढरपूरच्या ९ हजार ४७० शेतकऱ्यांचे ७० कोटी ९१ लाख, माढ्याच्या ५१२७ शेतकऱ्यांचे ३५ कोटी ७७ लाख, माळशिरसच्या ७३७४ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, बार्शीच्या ५ हजार १८२ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, करमाळ्याच्या ५५२७ शेतकऱ्यांचे २४ कोटी २५ लाख, अक्कलकोटच्या २५३८ शेतकऱ्यांचे १७ कोटी १८ लाख, मोहोळच्या २४७६ शेतकऱ्यांचे १६ कोटी ९६ लाख, मंगळवेढ्याच्या २३३८ शेतकऱ्यांचे १२ कोटी ५८ लाख, सांगोल्याच्या १९९४ शेतकऱ्यांचे १० कोटी ११ लाख, दक्षिणच्या ११९९ शेतकऱ्यांचे ७ कोटी ७९ लाख व उतरच्या १०७५ शेतकऱ्यांचे ८ कोटी ७४ लाख रुपये कर्जमाफ झाले होते.

Web Title: Solapur District Central Bank exceeds loan of Rs 113 crore, 17,000 beneficiaries of previous loan waiver again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.