राज्यातील ऊस गाळपात यंदाही सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 04:24 PM2019-03-23T16:24:22+5:302019-03-23T16:25:17+5:30
सोलापूरचे सर्वच ३१ कारखाने बंद; गाळपात कोल्हापूर दुसºया तर अहमदनगर तिसºया क्रमांकावर
सोलापूर : ऊस गाळपात यंदाही सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावरच असून दुसºया क्रमांकावर कोल्हापूर तर तिसºया क्रमांकावर अहमदनगर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यातील हंगाम सुरू केलेले सर्वच ३१ कारखाने बंद झाले असले तरी कोल्हापूर व अहमदनगरचे काही कारखाने अद्यापही सुरू आहेत.
राज्यातील साखर हंगाम यावर्षी एक नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता. यावर्षी सर्वाधिक सहकारी व खासगी अशा १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले साखर कारखाने पाच फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत राज्यातील १२० हून अधिक साखर कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ३१ कारखान्यांचा पट्टा पडला असून, जिल्ह्याचे एकूण गाळप एक कोटी ५९ लाख ९५ हजार ७४२ मे.टन इतके झाले आहे. साखर उत्पादन एक कोटी ६३ लाख ६६ हजार ६५३ क्विंटल इतके झाले असून साखर उतारा १०.२३ इतका पडला आहे.
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. यापूर्वी अधिकाधिक ३० पर्यंतच साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता.
सोलापूर जिल्ह्यानंतर कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्याचे गाळप आहे, कोल्हापूरच्या २२ कारखान्यांनी एक कोटी २९ लाख ७० हजार मे.टन. तर अहमदनगर जिल्ह्याचे एक कोटी २७ लाख ६५ हजार मे. टन. गाळप झाले आहे, कोल्हापूरच्या पाच तर अहमदनगरच्या १५ साखर कारखान्यांचे गाळप अद्यापही सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यापैकी दुसºया क्रमांकावर कोण?,हे संपूर्ण कारखाने बंद झाल्यानंतरच समजणार आहे; मात्र सोलापूर जिल्ह्यापेक्षा अन्य कोणताही जिल्हा गाळप करु शकणार नाही कारण राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा हंगाम अखेरला आला आहे.
विठ्ठलराव शिंदे राज्यात पहिला
- - यावर्षी हंगाम सुरू केलेल्या राज्यातील १९५ साखर कारखान्यांपैकी माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप उच्चांकी म्हणजे १७ लाख ४४ हजार १४९ मे. टन इतके झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर कारखान्याचे गाळप १६ लाख ८९ हजार ६०० मे. टन इतके झाले असून हा कारखाना सुरू आहे. त्यामुळे आज तरी विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात राज्यात प्रथम आहे.
- च्राज्यातील १९५ साखर कारखान्यांचे एकूण ९१७.०३ लाख मे.टन गाळप झाले असून एक हजार २५ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्याचा साखर उतारा ११.१५ टक्के इतका मिळाला आहे.