सोलापूर जिल्ह्याला मिळाले नवे पर्यटनस्थळ; प्राण्यांचे पुतळे, अँफी थिएटर एकाच ठिकाणी
By शीतलकुमार कांबळे | Published: January 18, 2024 05:43 PM2024-01-18T17:43:59+5:302024-01-18T17:44:09+5:30
नांदनी येथे वन उद्यानाचे उद्घाटन : वन पर्यटनाला चालना
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : जिल्ह्यासाठी वन उद्यानच्या रूपाने एक नवे पर्यटन स्थळ मिळाले आहे. पक्षी- प्राण्यांचे पुतळे, अँफी थिएटर आदी एकाच ठिकाणी साकारण्यात आले आहे. नांदनी येथील वन उद्यानाचे गुरुवार 18 जानेवारी रोजी उद्घाटन झाले.
नांदणी हे गाव सोलापूर जिल्हयाच्या ठिकाणापासून 25 किलोमीटर अंतरावर असून सोलापूर- विजापूर महामार्ग क्रमांक 52 लगत वसलेले आहे. कर्नाटक राज्याच्या सिमेपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच विजापूर-कुडल संगम-सोलापूर या पर्यटन मार्गावर नांदणी वनउद्यान हा पर्यटकांचा महत्वाचा विसावा असल्याने या ठिकाणी वनक्षेत्रात गट क्रमांक 03 मध्ये 2.00 हे. क्षेत्रावर “नांदणी वनउदयान” ची निर्मिती करण्यात आली आहे.
उद्यानात आहेत या सुविधा
लहान मुलांसाठी बालोद्यान, ट्री लाईन, हवामानस्थानक, बंजी जंम्पिग, टेहळणी मनोरा तसेच हिरकणी कक्ष, वन्यप्राण्याविषयी माहिती देणाऱ्या बोलक्या भिंती, वन्यप्राण्यांचे पुतळे, ग्रीन टनेल, स्थानिक वृक्षलागवड, वाहतुक नियम संकेतचिन्ह, ॲम्पिथिएटर, अशा बाबींचा समावेश आहे.