सोलापूर जिल्हा ; शेतकºयांच्या नावाखाली विमा कंपनीचंच होतंय भलं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:50 AM2018-08-07T11:50:01+5:302018-08-07T11:51:38+5:30
जमा झाले ८२ कोटी : ६३ हजार शेतकºयांना मिळाले ३१.२२ कोटी
अरुण बारसकर
सोलापूर : संपूर्ण जिल्ह्यातून दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी खरीप पिकांसाठी विम्याची रक्कम भरली असली तरी अवघ्या ६३ हजार २०९ शेतकºयांना पैसे मिळाले आहेत. विमा कंपनीला मिळालेली रक्कम व कंपनीने शेतकºयांना दिलेली नुकसान भरपाईची रक्कम पाहता कंपनीचेच भले होत असल्याचे दिसत आहे.
अतिवृष्टी, कमी पाऊस, गारपीट व अन्य कारणांमुळे पिकांचे नुकसान होते. त्यावेळी पीक विम्याचा चांगलाच आधार शेतकºयांना होतो. काहीअंशी तरी नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. सोलापूर जिल्हा हा रब्बी असला तरी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांसाठी पीक विम्याची रक्कम भरुन घेतली जाते.
मागील तीन-चार वर्षांपासून पिकांचा विमा भरण्याकडे शेतकºयांचा कल आहे. विम्याची रक्कम भरणाºया शेतकºयांपैकी काही शेतकºयांना नुकसान भरपाईही मिळते. यामुळे विमा भरण्यासाठी शेतकºयांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी खरीप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली होती. यामध्ये कर्जदार ७ हजार ६५९ व बिगर कर्जदार दोन लाख १९ हजार ३११ शेतकºयांचा सहभाग होता.
शेतकरी, केंद्र शासन व राज्य शासनाने एकूण ८१ कोटी ८४ लाख ८३ हजार रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडे जमा केली होती. यापैकी ६३ हजार २०९ शेतकºयांना ३१ कोटी २२ लाख ८ हजार रुपये इतकी रक्कम नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मिळाली आहे.
आठ तालुक्यांना वगळले
- - बार्शीच्या २६ हजार ९८९, अक्कलकोटच्या १७ हजार ११५ व दक्षिणच्या १९ हजार ७२ अशा एकूण ६३ हजार २०९ शेतकºयांना मिळाली नुकसान भरपाई, परंतु आठ तालुके वगळले.
- - बार्शीच्या ८५ हजार ३१६, अक्कलकोटच्या २४ हजार ६४३, दक्षिणच्या २८ हजार ८६७, उत्तरच्या ४ हजार २४५, मोहोळच्या १ हजार ६८६, पंढरपूरच्या ७३, मंगळवेढ्याच्या ५३ हजार ७४६, सांगोल्याच्या १० हजार ९८३, माळशिरसच्या ५११, माढ्याच्या ११ हजार ७३० व करमाळ्याचे ५ हजार १७० अशा दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली होती.
- - कर्जदार ४ हजार ४०५ व बिगर कर्जदार एक लाख ५९ हजार ३५६ अशा विमा भरणाºया एक लाख ६३ हजार ७६१ शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
- - शेतकºयांनी १० कोटी २० लाख व केंद्र तसेच राज्य शासनाने विमा कंपनीकडे ८१ कोटी ८४ लाख ८३ हजार रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते. प्रत्यक्षात ३१ कोटी २२ लाख ८ हजार रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना दिल्याने जमा झालेल्यापैकी ५० कोटी ६२ लाख ७५ हजार रुपये कंपनीकडे शिल्लक आहेत.
मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारावर पिकांचे उंबरठा नुकसान ठरवले जाते. यामुळे सर्वच पिकांना नुकसान भरपाई मिळेल असे नाही. विमा कंपनीकडे आजही काही शेतकºयांची प्रकरणे पेंडिंग आहेत.
- बसवराज बिराजदार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
एकाच तालुक्यातील एका मंडलातील शेतकºयांना नुकसान भरपाई मिळते, मात्र शेजारच्या मंडलातील शेतकरी पैसे भरुनही नुकसान भरपाईपासून वंचित ठेवला जातो. पीक कापणी प्रयोग कागदावरच असतात.
- प्रभाकर देशमुख,
अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना