दुष्काळी निधी वाटपात सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 07:26 PM2019-02-16T19:26:29+5:302019-02-16T19:28:03+5:30
सोलापूर : दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी राज्य शासनाने दिलेला निधी वाटप करण्यात सोलापूर जिल्हा पुणे विभागात पहिल्या क्रमांकावर आला आहे. ...
सोलापूर : दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी राज्य शासनाने दिलेला निधी वाटप करण्यात सोलापूर जिल्हा पुणे विभागात पहिल्या क्रमांकावर आला आहे. शासनाने दिलेल्या ९७ कोटींपैकी ४२ कोटींचा निधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी जिल्हा प्रशासनाच्या गतीचे कौतुक केले आहे. दुसºया टप्प्यासाठी आणखीन ९७ कोटींचा निधी मिळाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
दुष्काळी मदत निधीचे वाटप, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबाबत जैन यांनी गुरुवारी सर्व जिल्हाधिकाºयांचा मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सने आढावा घेतला. या दोन्ही योजनेच्या कामात युद्धपातळीवर गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहेत की नाही, याची खात्री करून तसा अहवालही पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
दुष्काळी मदत निधीचे वाटप करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण ३८८ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील दिलेला ९७ कोटींचा निधी ४० टक्के वितरित करण्यात आला आहे. दुसºया टप्प्यात आणखीन ९७ कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आला असून, येत्या आठ दिवसात हा निधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून शेतकºयांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्पयात सुमारे पाच लाख शेतकºयांसाठी ९० कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे. २६ फेब्रुवारीपासून शेतकºयांना या निधीचेही वितरण बँक खात्यात होत आहे.
यासाठी यादी किसान सन्मान पोर्टलवर भरण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत दोन्ही योजनेतून सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे कामकाज सुरू आहे.
बँकेत मदत पडून न राहण्यासाठी विशेष दक्षता
शासनाने दिलेल्या निधीचे वितरण बँकेकडून लाभार्थ्यांना वेळेत होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकदा देण्यात आलेला मदत निधी बँकेतच पडून राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बँकेत देण्यात आलेला निधी प्रत्यक्षात किती शेतकºयांना मिळाला, याची माहितीही शासनाने महसूल खात्याकडून मागविली असून, याबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी वाटपाला गती
- पंतप्रधान सन्मान योजनेसाठी लाभार्थी संख्या निश्चित करून केंद्र शासनाकडे अपेक्षित अनुदानाची मागणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आढावा बैठक घेण्यात येत होती. सुमारे पाच लाख शेतकºयांना पहिल्या टप्प्यात दोन हजार रुपयांप्रमाणे मदत मिळण्याची शक्यता आहे. हा निधीही २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न महसूल खात्याकडून युद्धपातळीवर सुरु करण्यात आला आहे.