सोलापूर जिल्ह्याचा ९२़.४७ टक्के निकाल, मुलींच टॉपर

By admin | Published: June 13, 2017 01:22 PM2017-06-13T13:22:09+5:302017-06-13T13:24:02+5:30

.

Solapur district resulted in 92 percent results, followed by female topper | सोलापूर जिल्ह्याचा ९२़.४७ टक्के निकाल, मुलींच टॉपर

सोलापूर जिल्ह्याचा ९२़.४७ टक्के निकाल, मुलींच टॉपर

Next


आप्पासाहेब पाटील : सोलापूर आॅनलाइन लोकमत
सोलापूर दि १३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला़ यात सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.४७ टक्के एवढा लागला आहे़ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती, अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातून एकूण ६६ हजार १०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते़ त्यापैकी ६१ हजार १२६ विद्यार्थी पास झाले आहेत़
तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे ---
अक्कलकोट : ९०़९८ टक्के
बार्शी : ९३़५७ टक्के
करमाळा : ८६़०६ टक्के
माढा : ८९़६२ टक्के
माळशिरस : ८८़४७ टक्के
मंगळवेढा : ९१़६३ टक्के
मोहोळ : ९४़१७ टक्के
पंढरपूर : ८८़९८ टक्के
उत्तर सोलापूर व शहर : ९१़०१ टक्के
सांगोला : ९०़६१ टक्के
दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे. त्यामुळे आपल्याला किती टक्के गुण मिळाले याबाबतची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता ताणली होती़ दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 14 लाख विद्यार्थ्यांनी मंडळाकडे आवेदन पत्रे भरली होती.

Web Title: Solapur district resulted in 92 percent results, followed by female topper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.