coronavirus; सोलापूर जिल्ह्यात वीस हजार पुणेकरांची तर बारा हजार मुंबईकरांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:51 AM2020-03-27T11:51:29+5:302020-03-27T11:56:37+5:30

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काळजी; जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने आरोग्य विभागाची मोहीम

In Solapur district, there are twenty thousand Puneites and twelve thousand Mumbaiis | coronavirus; सोलापूर जिल्ह्यात वीस हजार पुणेकरांची तर बारा हजार मुंबईकरांची तपासणी

coronavirus; सोलापूर जिल्ह्यात वीस हजार पुणेकरांची तर बारा हजार मुंबईकरांची तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देनागरी हिवताप योजना विभागाच्या वतीने गेली चार दिवस शहरात डासांचा प्रतिबंध करण्यासाठी धुराळणी करण्यात आलीएक लिटर पाण्यामध्ये १० मिलिलिटर सोडियम हायपोक्लोराईटचे प्रमाण मिसळून त्याद्वारे फवारणी केली जात आहेआगामी चार दिवसांत शहरातील विविध भागात सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी होईल

सोलापूर : जिल्ह्यात पुण्याहून आलेल्या २० हजार ३३५ तर मुंबईहून आलेल्या १२ हजार १४९ नागरिकांची जिल्हा आरोग्य विभागाने तपासणी केली आहे. 

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसात पुणे व मुंबईहून नागरिकांचे लोंढे सोलापूर शहर व जिल्ह्यात परतले आहेत. रेल्वे, एसटी बस, चारचाकी व दुचाकीवरून येणाºया या लोकांना अडवू नका. घरी जाऊन यांना स्थिरावू द्या, त्यानंतर आरोग्य तपासणी मोहीम घेण्याची सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली होती. जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी तालुका आरोग्य अधिकाºयांना त्यांच्या हद्दीत येणाºया प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व गावात नव्याने आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.

गेल्या तीन दिवसात आरोग्यसेवक, आशा कर्मचाºयांनी ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस पाटलांच्या मदतीने हे सर्वेक्षण केले आहे. पुण्या व मुंबईहून परतलेल्या नागरिकांचा प्रवासाचा इतिहास नोंदविण्यात आला आहे. यात सर्दी व खोकल्यांचा त्रास असलेल्यांची तपासणी करण्यात आली आहे. परदेश दौरा करून परतल्यांवर कडक निगराणी ठेवण्यात येत आहे. याशिवाय परदेश दौरा करून परतलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना घरात राहण्याबाबत सूचित केले    आहे. त्यांच्या हालचालींचा दररोज आरोग्य विभागातर्फे आढावा घेतला जात आहे.

तालुक्यासाठी व्हॅन तयार
- प्रत्येक तालुक्यासाठी निजर्तुंक औषधाची फवारणी करणे व अन्य सुविधा असलेली एक व्हॅन तयार करण्यात येत आहे. याबाबत संबंधित डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आल्याचे  आरोग्य विभागाने सांगितले.

निर्जंतुकीकरणासाठी फवारणी
कोरोनाचा विषाणू, साथीच्या इतर आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक औषधे फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. सोडियम हायपोक्लोराईटच्या सहाय्याने गर्दीच्या ठिकाणी फवारणी केली जात आहे. शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागाने विविध कामे हाती घेतली आहेत. वॉर्ड आॅफिसरमार्फत बाहेरुन आलेल्या नागरिकांची नोंदणी केली जात आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भाजी मंडई, मेडिकल, दुग्धोपयोगी माल विक्रीची दुकाने अशा विविध ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात येत आहे.

एक लिटर पाण्यामध्ये १० मिलिलिटर सोडियम हायपोक्लोराईटचे प्रमाण मिसळून त्याद्वारे फवारणी केली जात आहे. सोडियम हायपोक्लोराईट हे सूक्ष्मजीवांना नष्ट करते. चीनमध्ये हेच वापरण्यात आले होते, असे नागरी हिवताप योजना विभागाच्या जीवशास्त्रज्ञ पूजा नक्का यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आगामी चार दिवसांत शहरातील विविध भागात सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी होईल. यासाठी गर्दीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

नागरी हिवताप योजना विभागाच्या वतीने गेली चार दिवस शहरात डासांचा प्रतिबंध करण्यासाठी धुराळणी करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांत बाळीवेस, अंदुरे बोळ, मसरे गल्ली, कुंभारवाडा, माणिक चौक, भांडे गल्ली, शुक्रवार पेठ, बेगम पेठ पोलीस चौकी परिसर, राहुल गांधी झोपडपट्टी परिसर, दहिटणे परिसर, कुंभार वेस, कुर्बान हुसेन नगर, नेहरु नगर, भारतरत्न इंदिरा गांधी नगर यासह परिसरात धुराळणी आणि फवारणीची कामे करण्यात आली. 

Web Title: In Solapur district, there are twenty thousand Puneites and twelve thousand Mumbaiis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.