ऊस गाळपात सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर

By दिपक दुपारगुडे | Published: January 13, 2024 05:58 PM2024-01-13T17:58:37+5:302024-01-13T17:58:54+5:30

सोलापूर : कोल्हापूर व पुणे विभागातील गाळपाचा वेग दररोज वाढत असला तरी आज सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. माञ ...

Solapur division is leading in the state in sugarcane siltation | ऊस गाळपात सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर

ऊस गाळपात सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर

सोलापूर: कोल्हापूर व पुणे विभागातील गाळपाचा वेग दररोज वाढत असला तरी आज सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. माञ काही दिवसात कोल्हापूर व पुणे विभागातील साखर कारखाने ऊस गाळपात पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील १८ साखर कारखान्यांनी गाळपाचा पाच लाखाचा टप्पा पार केला आहे. सोलापूर विभागाचे गाळप ११३ लाख तर कोल्हापूर व पुणे विभागाचे गाळप १११ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्हाचे गाळप ९० लाख मेट्रिक टन इतके झाले आहे.

राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाने आता वेग घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला ऊस तोडणी मजुरांमुळे गाळपाला व्यत्यय आला होता माञ नंतर काही साखर कारखाने वगळता पुरेशा तोडणी यंञनेवर साखर कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू आहेत. यंञनेअभावी काही साखर कारखान्याचे गाळप अतिशय मंद गतीने सुरू आहे.

सध्या ऊस गाळपात सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. पुणे व कोल्हापूर विभागापेक्षा सोलापूर विभागाचे गाळप अवघ्या एक लाख मेट्रिक टनाने अधिक आहे. माञ सध्या कोल्हापूर व पुणे विभागातील साखर कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू आहेत तर सोलापूर जिल्हात ऊस तोडणीसाठी पुरेशी यंञना नाही. याचा फटका साखर कारखान्यांना बसत आहे. 

बारामती ॲग्रो गाळपात प्रथम

राज्यात बारामती ॲग्रो. दौंड या साखर कारखान्याचे गाळप सर्वाधिक ११ लाख मेट्रिक टन इतके झाले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ९ लाख १० हजार तर यशवंतराव मोहिते कृष्णा रेठरेबुद्रुकचे गाळप ७ लाख ३१ हजार मेट्रिक टन इतके झाले आहे.

Web Title: Solapur division is leading in the state in sugarcane siltation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.