Solapur: डॉक्टर झोपी गेले, शेजाऱ्यांनी फोन करून उठवले, दारात कागददपत्रे टाकून चोरट्यांनी दागिने पळवले
By काशिनाथ वाघमारे | Published: January 5, 2024 07:32 PM2024-01-05T19:32:03+5:302024-01-05T19:33:25+5:30
Solapur Crime News: कॅन्सर हॉस्पिटल परिसरात डॉ. अभिनव अशोक इंगळे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील साडेचार तोळ्यांचे दागिने व रोख पाच हजार असा दोन लाखांचा ऐवज पळवल्याची घटना घडली. झोपेत असलेल्या डॉक्टर कुटुंबास शेजाऱ्यांनी फोन करून उठवले आणि घडलेला प्रकार निदर्शनास आला.
- काशिनाथ वाघमारे
सोलापूर - कॅन्सर हॉस्पिटल परिसरात डॉ. अभिनव अशोक इंगळे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील साडेचार तोळ्यांचे दागिने व रोख पाच हजार असा दोन लाखांचा ऐवज पळवल्याची घटना घडली. झोपेत असलेल्या डॉक्टर कुटुंबास शेजाऱ्यांनी फोन करून उठवले आणि घडलेला प्रकार निदर्शनास आला. चोरीची ही घटना शुक्रवार, ५ जानेवारी २०२४ रोजी पहाटे घडली. याबाबत शहर पोलिसात डॉ. अभिनव इंगळे (रा. लक्ष्मीनगर, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिस सुत्रांकडील माहितीनुसार फिर्यादी डॉ. इंगळे हे येथील एका खासगी रुग्णालयात सेवा बजावत आहेत. गुरुवारी कामावरून आल्यानंतर जेवण उरकून सारेजण झोपी गेले. शुक्रवारी सकाळी ७:०० च्या सुमारास घरमालकांनी फोन करून डॉक्टर इंगळे यांना जागे केले. घराच्या गेटसमोर कपडे, कागदपत्रे, अस्ताव्यस्त पडल्याचे सांगितले. फिर्यादी बाहेर येऊन पाहताच घराच्या लाकडी दरवाजाची कडी तुटलेली व साहित्य बाहेर पडलेले दिसले. आत डोकावले असता बेडरूममधील कपाट उघडे दिसले. कपडे अस्ताव्यस्त पडलेले पाहून कपाट तपासले तेंव्हा सोन्याचे दागिने व पत्नीच्या पर्समधील पाच हजार रुपये चोरट्यांनी लांबविल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी १२ ग्रॅमचा लॉकेट, १० ग्रॅम सोन्याची मिनीगंठन, १८ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, दोन ग्रॅमच्या कानातील टॉप्स, १ ग्रॅमचे हातातील मनगट, चांदीचे २६ भार दागिने असा एकूण दोन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे.
श्वान पथकाला पाचारण
याची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी सोलापूर येथून श्वान पथकास पाचारण केले. घटनास्थळी आलेले श्वान घराच्या आसपास घुटमळत राहिले, तर फिंगर प्रिंट पथक येऊन ठसे घेऊन गेले. चोरीचा तपास सहायक पोलिस फौजदार अजित वरपे करत आहेत.