सोलापूर डीपीसीच्या निकालाने दिला सत्ताधाºयांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 11:53 AM2017-08-05T11:53:17+5:302017-08-05T11:53:24+5:30

सोलापूर दि ५  : जिल्हा नियोजन समितीच्या धक्कादायक निकालाने जिल्हा परिषदेतील राजकीय नूरच पालटून टाकला आहे. या निकालाने सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. तर रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवाला आम्ही जबाबदार नसून सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशा शब्दात मलम लावायलाही विरोधक विसरलेले नाहीत.

Solapur DPC's decision to push power to the people | सोलापूर डीपीसीच्या निकालाने दिला सत्ताधाºयांना धक्का

सोलापूर डीपीसीच्या निकालाने दिला सत्ताधाºयांना धक्का

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५  : जिल्हा नियोजन समितीच्या धक्कादायक निकालाने जिल्हा परिषदेतील राजकीय नूरच पालटून टाकला आहे. या निकालाने सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. तर रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवाला आम्ही जबाबदार नसून सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशा शब्दात मलम लावायलाही विरोधक विसरलेले नाहीत.
 जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी झालेली निवडणूक राजकीयदृष्ट्या चर्चेची ठरली. यात सात जागांसाठी आठ उमेदवार उभे होते. त्यातील सात जागांवर राष्टÑवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या चार जागा निवडून आल्या. तर तीन जागा सत्तापक्षाला मिळाल्या. सत्ताधारी गटाचे उमेदवार रणजितसिंह शिंदे अखेरच्या फेरीतही ८२६ मतांचा कोटा गाठू शकले नाहीत. त्यामुळे यांचा अनपेक्षित पराभव झाला. 
नगरपालिका गटातही राष्टÑवादीनेच बाजी मारली. तीन उमेदवारांमधून मंगळवेढ्याचे नगरसेवक अजित जगताप यांनी ९८ मते मिळवून विजय संपादन केला. येथीलच शिवसेनेचे नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी यांना ९४ मते मिळाली. शिवसेनेसह असलेल्या महाआघाडीत असलेल्या १६० मतांवर नगरपरिषद प्रवर्गात मात केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 
जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागले. सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी गटाचे चार उमेदवार रिंगणात होते. तीन विजयी झाले. रणजितसिंह शिंदे यांचा पराभव झाला. तर वसंतराव देशमुख, अतुल पवार, भारत शिंदे यांचा विजयझाला. राष्टÑवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे चारही उमेदवार निवडून आले. शेकापचे सचिन जाधव यांनी १३ मतांचा पल्ला गाठला. उमेश पाटील पहिल्या फेरीत विजयी झाले. विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांची मते दुसºया फेरीत वाढली. तर शिवसेनेचे नीलकंठ देशमुख यांना सहाव्या फेरीपर्यंत लढत देऊन विजय मिळवावा लागला.
---------------------
एक झालो, आता एकत्र राहणार - साठे
४या विजयावर प्रतिक्रिया देताना पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बळीराम साठे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ असूनही केवळ चुकीच्या नियोजनामुळे आम्हाला सत्ता स्थापन करता आली नव्हती. मात्र यावेळी सर्वांना सोबत घेऊन योग्य नियोजन केले. सर्वांची मते विचारात घेतली, त्यामुळे हे यश मिळाले आहे. आता एकत्र आलो आहोत, पुढेही एकत्र राहून काम करू, असे ते म्हणाले. विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दीपक साळुंखे, रश्मी बागल, राजूबापू पाटील, लतिफभाई तांबोळी या सर्वांच्या सहकार्यातून हे यश मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला.
-------------------
नियोजनात आम्ही चुकलो - संजय शिंदे
४या निकालासंदर्भात प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाले, आम्ही नियोजनात चुकलो हे मान्य करावेच लागेल. नियोजनाच्या काळात आपण गावात नव्हतो, त्यामुळे त्यात भाग घेता आला नाही. १० चा कोटा केला होता. त्याचाही फटका बसला असावा. आम्हाला अतिविश्वास नडला. केवळ एक-दोन मतांमध्ये गोंधळ झाल्याने सर्व जागांवर विजय मिळविता आला नाही, हे त्यांनी मान्य केले. नगरपालिका स्तरावरही राष्टÑवादीच्या उमेदवाराचा विजय झाल्याच्या मुद्यावर ते म्हणाले, स्थानिक स्तरावर विषय वेगळे असतात. त्यामुळे तिकडे आम्ही मागे पडलो, असे म्हणता येणार नाही.
-------------
आघाडीची नऊ मते फुटली
४राष्टÑवादी आणि मित्रपक्षांकडे २७ मते असताना त्यांच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ३६ मते मिळाली. यावरून सत्ताधारी गटाची नऊ मते फुटली, असे सांगितले जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सचिन देशमुख यांनीही या निवडणुकीत बाजी मारली. त्यांना पहिल्या पसंतीची १३ मते मिळाली. आपणास १५ मते मिळणार होती. मात्र दोन मते सहकारी उमेदवारांना देण्यासाठी आपणच सांगितले, असे देशमुख म्हणाले.

Web Title: Solapur DPC's decision to push power to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.