Solapur: पाठलाग करताना गाडी सोडून चालक पळाला; कत्तलीसाठी नेणाऱ्या सहा जनावरांना मिळाले जीवदान
By संताजी शिंदे | Published: May 6, 2023 12:34 PM2023-05-06T12:34:09+5:302023-05-06T12:34:37+5:30
Solapur: बेकायदा कत्तली करण्यासाठी जनावरे घेऊन जाणाऱ्याचा पाठलाग करीत असताना, चालक व किन्नर गाडी जागेवर थांबवून पळून गेले. गाडीची पहाणी केली असता, पाठीमागे सहा जणारवरे आढळून आले.
- संताजी शिंदे
सोलापूर - बेकायदा कत्तली करण्यासाठी जनावरे घेऊन जाणाऱ्याचा पाठलाग करीत असताना, चालक व किन्नर गाडी जागेवर थांबवून पळून गेले. गाडीची पहाणी केली असता, पाठीमागे सहा जणारवरे आढळून आले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही कामगिरी केली.
पुणे रोवडवरून सोलापुरच्या दिशेने बेकायदा कत्तलीसाठी जनावरे येत असल्याची माहिती हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यर्त्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पुणे महामार्गावरील सावळेश्वर येथे सापळा रचण्यात आला होता. माहितीनुसार एक पिकअप वाहन (क्र.एमएच-४५ टी-३३९८) हे वाहन वेगात येताना दिसले, गोरक्षकांनी त्याला आडवण्याचा प्रयत्न केला. वाहन वेगात पुढे निघून गेले, त्यामुळे गोरक्षकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान कार्यकर्त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क साधून माहिती दिली.
फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस तात्काळ बाळे येथे येऊन थांबले. पिकअप वेगात पुढे निघून गेली, गोरक्षक आणि पोलिसांनी पाठलाग करून गाडी आडवली, दरम्यान वाहन चालक व किन्नरने गाडी रस्त्याच्या कडेला लावून पळून गेले. गाडीची तपासणी केली असता, त्यात ६ गोवंशाची जनावरे आढळून आले.
पिअप वाहन पोलिसांच्या मदतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. वाहन चालकावर प्राणी संरक्षण कायदा व गोहत्या बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गाडीतील ६ गोवंशांना अहिंसा गोशाळा येथे सोडून त्यांना जीवदान देण्यात आले. कारवाई यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल धर्मजागरण प्रमुख प्रमोद येलगेटी, पवनकुमार कोमटी, विनायक निक्ते, पवन बल्ला, अविनाश मदनावाले, राहुल लंगडेवाले, कुमार आंबट आदी गोरक्षक उपस्थित होते.