सोलापूर 'एक्साइज'ची तीन ढाब्यांवर धाडी; हॉटेलचालकासह ११ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

By Appasaheb.patil | Published: August 14, 2023 06:49 PM2023-08-14T18:49:13+5:302023-08-14T18:49:20+5:30

हॉटेल, ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. 

Solapur Excise raid on three dhabas Cases filed against 11 drunkards including hotelier | सोलापूर 'एक्साइज'ची तीन ढाब्यांवर धाडी; हॉटेलचालकासह ११ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

सोलापूर 'एक्साइज'ची तीन ढाब्यांवर धाडी; हॉटेलचालकासह ११ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

googlenewsNext

सोलापूर : हॉटेल, ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर शहर परिसरातील ढाब्यांवर टाकलेल्या धाडीत तीन हॉटेल चालकांसह ११ मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक राहूल बांगर यांच्या पथकाने सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील हॉटेल स्वाद या ढाब्यावर छापा टाकला. ढाबा चालक चंद्रशेखर खंडू काळे हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याच्यासह रिजवान फकरोद्दीन शेख, आनंद धनाजी सावंत, महिबूब महंमद हानीफ शेख व बसवराज सिद्रामाप्पा मंद्रूपकर या चार मद्यपी ग्राहकांना अटक केली.  

 दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने सोलापूर - मंगळवेढा रोडवरील होटेल सह्याद्री याठिकाणी छापा टाकून ढाबा चालक गजानन बाबूराव कोरेसह राजेंद्र दामोदर सुतकर, विष्णू कृष्णा पाठक व स्वप्निल चंद्रकांत अडसुळे यांना अटक केली तर सोलापूर-विजापूर रोडवरील हॉटेल मैत्री याठिकाणी दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने  छापा टाकून ढाबा चालक प्रसन्न जगदिश व्यास यासह सोहेल मोहिन शेख, सद्दाम हुसेन इमामसाब नदाफ, सुरेश श्रीपती शिवशरण व संजय आत्माराम चव्हाण या चौघांना अटक केली. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक राहूल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान किरण खंदारे, चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे यांच्या पथकाने पार पडली. शासनाच्या वतीने सरकारी वकील संतोष पाटील यांनी न्यायालयात समक्षपणे बाजू मांडली. कोर्ट ऑर्डर्ली मयुरेश भोसेकर यांनी न्यायालयीन प्रक्रियेत मदत केली.

एका दिवसात तपास पूर्ण, न्यायालयाची शिक्षा 
गुन्ह्यातील तपास अधिका-यांनी एका दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र सोमवारी न्यायालयात सादर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालयाच्या नम्रता बिरादार यांनी तिन्ही हॉटेल चालकांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व सर्व अकरा मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Web Title: Solapur Excise raid on three dhabas Cases filed against 11 drunkards including hotelier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.