‘यूपीएससी’त फडकाविला सोलापूरचा झेंडा; अनय नावंदरच्या यशाने सोलापूरची मान उंचाविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 07:20 PM2022-05-31T19:20:16+5:302022-05-31T19:20:21+5:30

यशस्वी भव: अनयच्या यशाची त्रिसूत्री..स्वयंप्रेरणा, परिश्रम अन् मेडिटेशन

Solapur flag hoisted at UPSC; The success of Anya Navander made Solapur proud | ‘यूपीएससी’त फडकाविला सोलापूरचा झेंडा; अनय नावंदरच्या यशाने सोलापूरची मान उंचाविली

‘यूपीएससी’त फडकाविला सोलापूरचा झेंडा; अनय नावंदरच्या यशाने सोलापूरची मान उंचाविली

googlenewsNext

सोलापूर : सोलापूरच्या अनय नावंदरने आज ‘यूपीएससी’ अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या महाकठीण परीक्षेत झेंडा फडकाविला. अनयला यशाचे गमक विचारले तर तो म्हणाला, पूर्वी यशस्वी झालेल्या मुलांचे मी अनेक व्हिडिओ पाहिले. त्यातून स्वत:च्या अभ्यासाची पद्धत स्वयंप्रेरणेनेच ठरविली. दहा-ते बारा तास अभ्यास केला अन् एकाग्रतेसाठी ध्यान केले. अनयचे यश स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरले आहे.

अनय नावंदर याने ३२ व्या रँकने यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाला. विशेष म्हणजे त्याने कोणताही क्लास लावला नव्हता. अभ्यासाची स्वयंप्रेरणाच त्याच्या कामी आली. अनय मूळचा सोलापूरचाच. वडील शहरात चार्टर्ड अकाऊंटंटची प्रॅक्टीस करतात. आई न्यायाधीश. सोलापूरसह पारनेर, माजलगाव व मुंबई येथे त्याचे शिक्षण झाले. मुंबई येथून २०१९ मध्ये त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबाद येथे एका मोठ्या कंपनीची नोकरी सोडून त्याने अभ्यास केला. अवघ्या तीन वर्षांतच त्याने यश मिळविले.

 

अनयने सोलापुरातील सेंट जोसेफ शाळेत एलकेजी ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. सिंदफना पब्लिक स्कूल माजलगाव त्यानंतर पारनेर येथे तो शिकला. अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण पुन्हा सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूल येथे पूर्ण केले. त्यानंतर तो अभियांत्रिकी शिक्षणासाठी मुंबई येथील आयसीटी कॉलेजमध्ये गेला. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका मोठ्या कंपनीत तो नोकरीस लागला. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. तीनच वर्षांत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला.

-------

ध्यानाचा लाभ

शेतीची आवड असल्यामुळे त्याने यूपीएसी परीक्षेत ऑप्शनल विषय म्हणून कृषी विषयाची निवड केली होती. अभ्यास करण्यासाठी मन एकाग्र असणे गरजचे असते. यासाठी ध्यानसाधना आवश्यक असते. अनय नावंदरला अभ्यास करताना ध्यानाचा चांगला फायदा झाला.

---

 

कलाही जोपासली

यूपीएससी परीक्षांचा अभ्यासक्रम हा मोठा असतो. यामुळे अनेक विद्यार्थी हे सतत अभ्यास करत असतात. पण, अनयने फक्त अभ्यास न करता कलाही जोपासली. त्याला तबला वादनाची आवड आहे. ही आवड जोपासत त्याने अभ्यासही केला. त्याने तबला वादनाच्या सहा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.

Web Title: Solapur flag hoisted at UPSC; The success of Anya Navander made Solapur proud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.