Solapur Flood; सोलापूर जिल्ह्यातील सहा गावे अंधारात; सात उपकेंद्रात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:28 AM2020-10-21T11:28:03+5:302020-10-21T11:30:54+5:30

अतिवृष्टीचा परिणाम; जिल्ह्यातील नुकसानीची ऊजार्मंत्र्यांनी घेतली माहिती

Solapur Flood; Six villages in Solapur district in darkness; Stagnant water in seven substations | Solapur Flood; सोलापूर जिल्ह्यातील सहा गावे अंधारात; सात उपकेंद्रात साचले पाणी

Solapur Flood; सोलापूर जिल्ह्यातील सहा गावे अंधारात; सात उपकेंद्रात साचले पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त स्वरूपात रोहित्र उपलब्ध राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार ?ाईल व इतर साहित्यांचा पुरेसा पुरवठाप्रतिकूल परिस्थितीतही वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व दजेर्दार ग्राहकसेवा देणे ही प्राथमिक जबाबदारी

सोलापूर : राज्यातील प्रामुख्याने नऊ जिल्ह्यांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा वीज यंत्रणेला मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सहा गावांमध्ये सध्या वीजपुरवठा उपलब्ध नाही. तसेच सात उपकेंद्रांमध्ये पाणी साचले असल्याने ते बंद आहेत. मात्र युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे व पयार्यी व्यवस्थेतून उर्वरित सर्व ठिकाणी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती ऊजार्मंत्री नितीन राऊत यांनी दिली.

सद्यस्थितीत वीजपुरवठ्यासंबंधी वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम सुरू असून पावसाच्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर कृषिपंपांचा वीजपुरवठा टप्पाटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कोरोनामुळे वीजक्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. वीज बिलांची वसुली अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. एकीकडे महसुलात घट होताना दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळ, अवकाळी मुसळधार पाऊस व परतीच्या पावसाची अतिवृष्टी यामुळे यंदा राज्यभरातील वीजयंत्रणेला मोठे तडाखे बसले आहेत. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व दजेर्दार ग्राहकसेवा देणे ही प्राथमिक जबाबदारी व कर्तव्य आहे.

पावसाळ्यात ज्या ठिकाणी वीजयंत्रणा नेहमी पाण्याखाली जाते, त्याचा अभ्यास करून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, अशा उपाययोजनांचा आराखडा तयार करून लगेचच या कामास सुरुवात करावी, असे निर्देश ऊजार्मंत्र्यांनी यावेळी दिले.

रब्बी हंगामात शेतकºयांना सुरळीत वीजपुरवठा होणार
अतिवृष्टीमधील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी किंवा साहित्याची आवश्यकता असल्यास ती त्वरित पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त स्वरूपात रोहित्र उपलब्ध करून ठेवावेत. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार ?ाईल व इतर साहित्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात येत असल्याचे ऊजार्मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

Web Title: Solapur Flood; Six villages in Solapur district in darkness; Stagnant water in seven substations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.