Solapur Flood; ५८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:22 PM2020-10-17T13:22:59+5:302020-10-17T13:23:06+5:30
सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात पुराचे पाणी; ८६०८ कुटुंबांचे शाळा, मठ, कारखान्यात स्थलांतर
सोलापूर : परतीच्या पावसाचा जबरदस्त आगमन झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेकडो गावे उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील ६२३ गावे जलमय झाली असून ८६०८ कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. एकूण ३२ हजार ५२१ नागरिकांनी जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना तसेच विविध धार्मिक मठांचा आसरा घेतला आहे. ५८ हजार ५८१ हेक्?टरवरील पिकांचे जबरदस्त नुकसान झाले आहे.
पुरात नऊ नागरिक वाहून गेले असून चार जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर अद्याप पाच लोक बेपत्ता आहेत. २१४ ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून रेस्क्यू आॅपरेशन मागील साठ तासांपासून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून महाराष्ट्र कमांडो फोर्स तसेच ह्यएनडीआरएफह्णच्या सहकार्याने मदतकार्यही जोरात सुरू आहे.
मागील ६० तासांपासून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यामुळे साडेसहाशेहून अधिक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना स्थलांतरित व्हावे लागले, तर ८२९ जनावरे दगावली असून २२५६ घरांची जबरदस्त पडझड झाली आहे. पुरामुळे ७८३२ पक्षी दगावले आहेत.