Solapur: पुणे, मुंबई, कर्नाटकसह अमेरिकेत निघाले सोलापुरातून गौरीचे मुखवटे
By काशिनाथ वाघमारे | Published: September 10, 2023 04:42 PM2023-09-10T16:42:59+5:302023-09-10T16:43:27+5:30
Solapur: दहा दिवसांवर आलेल्या गौरी गणपतीच्या आगमणाचे वेध गृहिणींना लागले असून घरोघरी त्याची तयारी सुरू झाली आहे. पेण, वाई, सांगली, कोल्हापूर, अकोला आणि अमरावतीतून सोलापूरच्या बाजार पेठेत गौरीचे मुखवटे दाखल झाले आहेत.
- काशिनाथ वाघमारे
सोलापूर - दहा दिवसांवर आलेल्या गौरी गणपतीच्या आगमणाचे वेध गृहिणींना लागले असून घरोघरी त्याची तयारी सुरू झाली आहे. पेण, वाई, सांगली, कोल्हापूर, अकोला आणि अमरावतीतून सोलापूरच्या बाजार पेठेत गौरीचे मुखवटे दाखल झाले आहेत. हेच मुखवटे यंदा पुणे, मुंबई, मराठवाडा, कर्नाटकसह अमेरिकत निघाले आहेत. या शिवाय महालक्ष्मी तयार सेट आणि साहित्याची खरेदी सुरू झाली आहे.
यंदा अमरावतीतून मुखवटे सर्वाधीक दाखल झाले असून ते मराठवड्यात तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर, नळदुर्ग आणि मुंबई, पुणेसह कर्नाटकात गुलबर्गा, विजयपूर, बेंगळुरूत मुखवटे नातेवाईकांकडे गेले आहेत. यंदा पीओपी आणि फायबर दोनही प्रकारात मुखवटे पाहायला मिळताहेत. यापैकी काही मुखवटे परदेशात जात असून सोलापूर शहरातील शशीकांत कुलकर्णी हे अमेरेकेत स्थायिक झालेल्या सुनेला येथून गौरीचे मुखवटे पाठवले आहेत.
रात्रभर जागून गौरीच्या उभारणीला जास्त वेळ लागू नये म्हणून काही गृहिणींनी आता पूर्णाकृती मूर्तीला पसंती देताहेत. नथ, कंबरपट्टा, दागिन्यासंह तयार सेट घेण्याकडे यंदाही गृहिणींचा कल दिसतोय. त्यामुळे पूर्णाकृती मूर्तीला पसंती मिळतेय.