सोलापूरला मिळणार ‘मातृवंदना’चा लाभ; पहिल्या बाळंतपणासाठी ५ हजारांची मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:05 AM2017-11-25T11:05:39+5:302017-11-25T11:08:28+5:30

गरोदर महिला आणि स्तनदा मातेसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजनेचा लाभ राज्यातील महिलांनाही मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पहिल्या बाळंतपणात तीन टप्प्यांमध्ये ५ हजार रुपयांची मदत दिली जाते.

Solapur gets the benefit of 'Matruvandana'; 5 thousand help for first childbirth! | सोलापूरला मिळणार ‘मातृवंदना’चा लाभ; पहिल्या बाळंतपणासाठी ५ हजारांची मदत !

सोलापूरला मिळणार ‘मातृवंदना’चा लाभ; पहिल्या बाळंतपणासाठी ५ हजारांची मदत !

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ५२५९ मातांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी सरकारकडे सादरकेंद्र सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी मातृवंदना योजनेची घोषणा केलीशासकीय आणि निमशासकीय महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही माता, बालकांचे आरोग्य आणि लसीकरण हा योजनेचा  मुख्य उद्देश


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५  : गरोदर महिला आणि स्तनदा मातेसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजनेचा लाभ राज्यातील महिलांनाही मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पहिल्या बाळंतपणात तीन टप्प्यांमध्ये ५ हजार रुपयांची मदत दिली जाते. जननी सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील ५२५९ मातांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी सरकारकडे सादर केली आहे.  
केंद्र सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी मातृवंदना योजनेची घोषणा केली होती. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव म्हणाले की, सप्टेंबरपर्यंत ही योजना काही ठराविक राज्यातच कार्यरत होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवर्गाची अट नाही; मात्र पहिल्या अपत्यासाठीच लाभ मिळणार आहे. शासकीय आणि निमशासकीय महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा यांनाही गरोदरपणात लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुण्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी कार्यशाळा झाली होती. जिल्ह्यातील आरोग्यसेवकांना या योजनेबाबत माहिती देण्याचे निर्देश दिलेले आहेत. या योजनेबरोबरच जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे. गर्भवतींकडून तीन प्रकारचे अर्ज भरून घेण्यात येतील. माता, बालकांचे आरोग्य आणि लसीकरण हा योजनेचा  मुख्य उद्देश आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोफत केले जाते. त्याचबरोबर आता थेट अनुदान मिळाल्यामुळे आहाराकडेही लक्ष राहील. यंदाच्या वर्षी जननी सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील ५२६९ यादी सरकारला सादर करण्यात आली आहे. पुढील सूचना आल्यानंतर इतर महिलांची यादी पाठविण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
------------------------------
अशी मिळणार मदत 
- १०००/- नोंदणीवेळी(नोंदणी लवकरात लवकर १५० दिवसांत आवश्यक)
- २०००/- सहा महिन्यांचे गरोदरपण पूर्ण झाल्यावर(किमान एक तपासणी)
- २०००/-  प्रसूतीनंतर लसीकरण पूर्ण झाल्यावर.
हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होईल.
--------------------
लसीकरण कार्ड महत्त्वाचे 
या योजनेचा लाभ देण्यासाठी लसीकरण कार्ड (एमसीपी कार्ड) ही महत्त्वाची गोष्ट आहे. लाभार्थ्यांनी आधार कार्ड किंवा सरकारी नियमानुसार आवश्यक असलेला फोटोप्रुफ ओळखपत्र देणे आवश्यक आहे. १ जानेवारी २०१७ पासूनच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांनी नेमका कुठे अर्ज करायचा याबाबतची माहितीही लवकरच जारी करण्यात येईल. 
- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. सोलापूर. 

Web Title: Solapur gets the benefit of 'Matruvandana'; 5 thousand help for first childbirth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.