पुण्यातील मैदानावर सोलापूरच्या मुलींनी परभणींच्या संघाचा केला पराभव

By Appasaheb.patil | Published: June 2, 2023 04:33 PM2023-06-02T16:33:20+5:302023-06-02T16:33:27+5:30

नाणेफेक जिंकून सोलापूर संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना परभणीच्या संघाने अवघ्या ३० षटकात ८१ धावा केल्या.

Solapur girls defeated Parbhani's team at the ground in Pune | पुण्यातील मैदानावर सोलापूरच्या मुलींनी परभणींच्या संघाचा केला पराभव

पुण्यातील मैदानावर सोलापूरच्या मुलींनी परभणींच्या संघाचा केला पराभव

googlenewsNext

सोलापूरपुणे येथे सुरू असलेल्या राज्य आमंत्रित १५ वर्ष वयोगटातील सोलापूर संघाच्या मुलींनी परभणींच्या संघाचा एकतर्फी पराभव केला. विजयानंतर विजयी संघातील खेळाडूंनी जल्लोष केला. आजपर्यंत अनेक विविध स्पर्धामुळे सोलापूरच्या संघाने विविध स्पर्धा जिंकल्या आहेत. 

दरम्यान, नाणेफेक जिंकून सोलापूर संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना परभणीच्या संघाने अवघ्या ३० षटकात ८१ धावा केल्या. यात सोलापूर संघाकडून आरणा वैभव इराबट्टीने ६ षटकात १७ धावा देत ४ गडी बाद केले. प्रतीक्षा नंदर्गी ने २ गडी बाद केले. विभावरी देवकाते व संचीता सपाटे हिने प्रतेकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात ८२ धावांचा पाठलाग करताना सोलापूर संघाने १५.३ षटकात १ बाद ८२ धावा केल्या. यात संचिता सपाटे ने नाबाद ३५ धावा व आर्णा इराबाट्टी ने नाबाद १० धावा करून सोलापूर संघाला विजय मिळवून दिला. या विजयाबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत  रेम्बुर्स यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.

Web Title: Solapur girls defeated Parbhani's team at the ground in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.