सोलापूर शासकीय रूग्णालयात पोलिसाकडून महिला आरोपीची छेडछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:18 PM2019-01-18T12:18:17+5:302019-01-18T12:19:23+5:30

सोलापूर : सोलापूर जिल्हा कारागृहातील महिला आरोपीचा विनयभंग केल्याप्रकरणी,  पोलीस नाईक युसूफ निजामोद्दिन काझी (नेमणूक शहर पोलीस मुख्यालय) याच्याविरुद्ध ...

In Solapur Government Hospital, woman trafficked by policemen | सोलापूर शासकीय रूग्णालयात पोलिसाकडून महिला आरोपीची छेडछाड

सोलापूर शासकीय रूग्णालयात पोलिसाकडून महिला आरोपीची छेडछाड

Next
ठळक मुद्देजेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला१५ दिवसानंतर वरिष्ठ महिला अधिकारी राऊंडला आल्यानंतर आरोपी महिलेने त्यांच्याकडे तक्रारकैदेतील महिला आरोपीच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले

सोलापूर : सोलापूर जिल्हा कारागृहातील महिला आरोपीचा विनयभंग केल्याप्रकरणी,  पोलीस नाईक युसूफ निजामोद्दिन काझी (नेमणूक शहर पोलीस मुख्यालय) याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा कारागृहात असलेल्या महिला आरोपीस २ नोव्हेंबर २0१८ रोजी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोबत पुरुष कैदीही असल्याने युसूफ काझी हा देखील तेथे आला होता. तो तुला कुठं तरी बघितल्यासारखं वाटतं आहे. 

तू खूप पैसे कमवलीस ना? मी तुला शोधायला आलो होतो. अगं मी तुला खूप शोधलं होतं, तुला काय मदत लागली तर सांग. असे म्हणत अश्लील भाषा करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. कैदेतील महिला आरोपीच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले. 
महिला आरोपीने हा प्रकार कारागृहाच्या महिला गार्डला सांगितला.

याबाबत पार्टी अंमलदार कुलकर्णी यांना ही माहिती दिली. पोलीस इंगळे तेथे आले व त्यांनी राहू द्या आम्ही त्यांना समजावून सांगतो असे म्हणून निघून गेले. १५ दिवसानंतर वरिष्ठ महिला अधिकारी राऊंडला आल्यानंतर आरोपी महिलेने त्यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेतल्यानंतर अ‍ॅड. तमशेट्टी यांनी कारागृहात जाऊन चौकशी केली. त्यानंतर बुधवारी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला फौजदार जाधव करीत आहेत. 

Web Title: In Solapur Government Hospital, woman trafficked by policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.