Solapur: विनापरवानगी झेडपीत आल्यास एक दिवसाची पगार कापणार, सीईओंचे निर्देश
By Appasaheb.patil | Published: August 30, 2023 05:20 PM2023-08-30T17:20:59+5:302023-08-30T17:21:22+5:30
Solapur News: जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत येणारे तालुकास्तर कार्यालयातील व क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात येण्यासाठी आता कार्यालय प्रमुखांची परवानगी बंधनकारक केले आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत येणारे तालुकास्तर कार्यालयातील व क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात येण्यासाठी आता कार्यालय प्रमुखांची परवानगी बंधनकारक केले आहे. विनापरवानगी जिल्हा परिषद मुख्यालयास आल्यास संबंधित कर्मचार्याची एक दिवसाची विनावेतन व एक दिवसाची रजा करण्याची कार्यवाही विभाग प्रमुखांनी करावी असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी बुधवारी काढले.
दरम्यान, पंचायत समिती, पंचायत समिती स्तरावरील उपविभाग, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायतीमधील काही कर्मचारी हे जिल्हा परिषद मुख्यालयास कामानिमित्त भेट देत असतात परंतू काही कर्मचारी हे कामाशिवाय अनावश्यक व अकारण जिल्हा परिषद मुख्यालयास वारंवार भेट देत असल्याची बाब सीईंओ मनिषा आव्हाळे यांच्या निर्दशनास आली होती. त्यानंतर सीइेंओ आव्हाळे यांनी जिल्हा परिषद मुख्यालयात येण्यासाठी आता कार्यालय प्रमुखांची रितसर लेखी परवानगी घेऊनच जिल्हा परिषद मुख्यालयास भेट द्यावी असे निर्देश दिले आहे. विनापरवानगी जिल्हा परिषदेत आल्यास एक दिवसाचा पगार अथवा रजा करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभाग प्रमुखांनी करावी असेही निर्देश दिले आहेत.