देशातील पहिल्या अटल टिंकरींग लॅबचे सोलापूरात उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:07 AM2018-04-04T11:07:32+5:302018-04-04T11:07:32+5:30
संशोधनवृत्ती वाढवा, कलामांचे स्वप्न पूर्ण करण्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांचे आवाहन
सोलापूर : शिक्षणाबरोबर संशोधनवृत्तीची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे़ त्यांच्यातील संशोधन वृत्तीला शाळेने वाव दिला पाहिजे़ ही संशोधनवृत्ती वाढली पाहिजे़ ही नवी पिढी डॉ़ कलामांचे स्वप्न पूर्ण करेल, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केली़
नीती आयोगाने दिलेल्या भारतातील पहिल्या अटल टिंकरींग लॅबचे उद्घाटन बेगम कमरुनिस्सा कारीगर गर्ल्स हायस्कूलमध्ये डॉ़ भारुड यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी बोलत असताना त्यांनी वरील अपेक्षा व्यक्त केली़ याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे, आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य जमिल दफेदार, जमियत ए उलमा हिंदचे अध्यक्ष मौलाना इब्राहीम जहूरकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, जितेंद्र पवार, उर्दू मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अ़जब्बार शेख, प्राचार्या सबीना इंगळगी, एटीएलचे समन्वयक ज़ जी़ दखणी, उपप्राचार्या पी़ ए़ सातखेडे, पर्यवेक्षिका मख्तारुन्निसा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़
प्रारंभी कुराण पठणाचे श्लोक सादर करुन प्रार्थना केली गेली़ प्रास्ताविकेतून प्राचार्या सबीना इंगळगी यांनी नीती आयोगाकडून भारतात प्रथमच अटल टिंकरींग लॅब या शाळेला मिळाल्याचे सांगून याचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांना करून देणार असल्याचे म्हणाले़
यावेळी जितेंद्र पवार यांनी अटल टिंकरींग लॅब मिळवून आणण्यात प्राचार्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करीत त्या जिद्दी आणि चिकाटी असल्याचे त्यांनी सांगितले़
आधुनिकतेचे शिक्षण मिळाले पाहिजे: सोनवणे
- यावेळी शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे बोलताना आज शेतकºयाचा मुलगा शेती करायला नको म्हणतोय, पारंपरिक शेतीप्रक्रिया त्याच्या शिक्षणाला शोभत नसल्याची खंत व्यक्त करीत शेतकºयांची मुले आधुनिक शेतीचे शिक्षण घेऊन शेती करणे अपेक्षित असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़