सोलापूर-इंद्रायणी रेल्वे बंद, पुण्यासाठी सोलापूर आगाराकडून एसटीच्या १६ जादा गाड्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:16 PM2017-11-02T13:16:25+5:302017-11-02T13:17:30+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामार्फत आजपासून सोलापूरसह विविध आगारातून पुण्याकडे जाणाºया एस. टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २ : राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामार्फत आजपासून सोलापूरसह विविध आगारातून पुण्याकडे जाणाºया एस. टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली. सोलापुरातून दुपारच्यावेळी सुटणारी इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वे चार महिने बंद राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर-पुणे मार्गावर सोलापुरातून जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे. दररोज जाणाºया चाकरमान्यांचाही यात समावेश आहे. दुपारी सोलापूर येथून निघणाºया इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. ही सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्यांना सुलभ सेवा मिळावी या दृष्टीने विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सोलापूरसह अक्कलकोट, बार्शी आणि कुर्डूवाडी आगाराच्या वतीने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.
या नियोजनाप्रमाणे सोलापूरच्या बसस्थानकातून स्वारगेटपर्यंत सकाळी ११ वाजता, दुपारी १२.१५, १२.४५, १.४५ आणि २.४५ या वेळेत पाच जादा गाड्यांच्या फेºया वाढवण्यात आल्या आहेत. याच गाड्या स्वारगेटहून सकाळी ६.१५, ७.१५, ८.१५, सायंकाळी ६.३०, ७.३० या वेळेत सुटणार आहेत. सोलापूर आगाराच्या जाण्यायेण्याच्या मिळून दररोज १० फेºया अधिक वाढल्या आहेत.
अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अक्कलकोट ते स्वारगेट पाच फेºया वाढवल्या आहेत. पहिली गाडी सकाळी १० वाजता सुटेल. त्यानंतर दुपारी १२, १२.४५, ३.१५ आणि ४.१५ असे वेळापत्रक ठरले आहे. स्वारगेटहून अक्कलकोटला येणारी पहिली गाडी तेथून पहाटे ५.१५ ला सुटेल. त्यानंतर सकाळी ७.१५, ८.१५, सायंकाळी ५.१५ आणि ७.१५ अशी सुटणार आहे.
भगवंतनगरी बार्शी येथून स्वारगेटसाठी कुर्डूवाडीमार्गे जादा तीन फेºया वाढवण्यात आल्या आहेत. यात पहिली गाडी दुपारी ३.३० ला सुटणार आहे. दुसरी ४.१५ आणि सायंकाळी ५ वाजता सटेल. स्वारगेटहून सकाळी ८.१५, ९.१५ आणि १०.१५ वाजता या गाड्या बार्शीकडे येण्यासाठी सुटणार आहेत. कुर्डूवाडी बसस्थानकावरुन दुपारी ३.३० वाजता स्वारगेटकडे पहिली बस सुटणार आहे. त्यानंतर ४.१५ आणि सायंकाळी ५ वाजता तर स्वारगेटहून कुर्डूवाडीसाठी सकाळी ८.१५, ९.४५ आणि १०.४५ अशा परतीच्या गाड्यांचे वेळापत्रक ठरले असल्याचे विभाग नियंत्रक गायकवाड यांनी स्पष्ट केले.
-----------------------
दिवसभरात ३२ फेºयांचे नियोजन...
आजपासून जिल्ह्यातील ४ आगारातून पुणे स्वारगेटसाठी १६ फेºयांचे नियोजन आखले आहे आणि स्वारगेटहून परतीच्या १६ फेºया अशा ३२ फेºया वाढवण्यात आल्या आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेसने पुण्याकडे जाणाºया प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्यांना सुलभ सेवा मिळावी या दृष्टीने तो प्रवासी आकर्षित करण्यासाठी एस. टी. प्रशासनाने हे नियोजन आखले आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.