चायनाची मक्तेदारी मोडण्यावर सोलापुरातील कारखानदारांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:16 AM2020-06-24T11:16:44+5:302020-06-24T11:18:40+5:30

सोलापुरात तयार होताहेत अनेक प्रकारचे युनिफॉर्म; शहरात शेकडो गारमेंटचे काम घरगुती पद्धतीने

Solapur industrialists insist on breaking China's monopoly | चायनाची मक्तेदारी मोडण्यावर सोलापुरातील कारखानदारांचा भर

चायनाची मक्तेदारी मोडण्यावर सोलापुरातील कारखानदारांचा भर

Next
ठळक मुद्देअसोसिएशन अंतर्गत ३०० गारमेंट युनिट सभासद कार्यरत आहेतगारमेंट इंडस्ट्रीमध्ये सोलापूरचे ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून कार्यरत शेकडो प्रकारच्या युनिफॉर्म तयार करण्याची कुशलता सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांमध्ये

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर युनिफॉर्म हब म्हणून ओळख असलेल्या चायनाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शहरातील कारखानदारांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अनेक प्रकारच्या चांगल्या दर्जाचे युनिफॉर्म सोलापुरात तयार करीत असताना या कारखानदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर बनण्याचा संदेश दिला आहे. 

यापूर्वी सोलापूर शहरात आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन भरवले गेले. यास जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. येथील गारमेंट इंडस्ट्रीमधील उलाढाल दोनशे कोटींहून अधिक आहे. भविष्यात ती अनेक पटीने वाढू शकते. तशी ताकद आणि कुशल मनुष्यबळ सोलापुरात आहे. सोलापूरकडे केंद्र व राज्य सरकारने विशेष लक्ष देऊन आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोलापूरचे प्रेझेंटेशन केल्यास निश्चितच भविष्यात चायनासमोर आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म हबचा पर्याय निर्माण करू शकतो, असा विश्वास सोलापुरातील गारमेंट उद्योजकांनी व्यक्त केला.

कोरोना तसेच चायनाकडून भारतीय सैनिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरात चायनाविरोधात चीड निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देखील सोलापुरातील गारमेंट उद्योजकांनी चायनाच्या युनिफॉर्म उत्पादनावर बहिष्कर घातला पाहिजे, अशी भूमिका मांडली. 

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चायनाची मक्तेदारी आहे. युनिफॉर्म हबमध्ये देखील चायना वर्चस्व राखून आहे. चायनाकडून सर्वाधिक युनिफॉर्म आफ्रिका खंडात पुरवठा होतो. त्यानंतर भारतात देखील युनिफॉर्म तसेच रेडिमेड कपडे देखील पुरवठा होतो. बांगलादेशामार्फत चायना भारतात कपड्यांचा पुरवठा करतो. चीनला धडा शिकवण्याकरिता चीनची असलेली मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे. त्याकरिता सोलापूरसारख्या गारमेंट हब होऊ पाहणाºया शहराला शासनाकडून प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. जागतिक मार्केटदेखील उपलब्ध करून दिली पाहिजे.

शहरात शेकडो गारमेंटचे काम घरगुती पद्धतीने चालते
सोलापूर रेडिमेड गारमेंट असोसिएशनचे सचिव राजेंद्र कोचर म्हणाले, असोसिएशन अंतर्गत ३०० गारमेंट युनिट सभासद कार्यरत आहेत. तसेच इतर शेकडो गारमेंट शिलाई युनिट्स घरगुती कार्यरत आहेत. गारमेंट इंडस्ट्रीमध्ये सोलापूरचे ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी आम्ही मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहोत. त्याकरिता आंतरराष्ट्रीय प्रदर्शनही भरवले. त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. स्कूल युनिफॉर्मपासून मिलिटरी, इंडस्ट्रीयल, एअरलाईन्स, फार्मसी कंपन्यांसह इतर शेकडो प्रकारच्या युनिफॉर्म तयार करण्याची कुशलता सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांमध्ये आहे. येथील गारमेंट उद्योजकांमधील क्षमता वाढवण्याकरिता मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. त्यासोबत देशी आणि विदेशी मार्केटदेखील हवे आहे. मोठे निर्यात सुविधा केंद्र तसेच प्रशिक्षण केंद्र हवे आहे. सोलापूरचे युनिफॉर्म ब्रँड तसेच व्हॅल्यू वाढवण्यासाठी शासनाचा सक्रिय सहभाग हवा आहे. असे झाल्यास सोलापूर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठी झेप घेईल आणि चायनाला एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो. 

Web Title: Solapur industrialists insist on breaking China's monopoly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.