एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा

By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 13, 2024 06:43 PM2024-06-13T18:43:41+5:302024-06-13T18:44:22+5:30

विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही रक्कम मिळाली आहे

Solapur Insurance amount of Rs 113 crore deposited in the account of one lakh 90 thousand farmers | एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा

एक लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी रुपये विमा रक्कम जमा

सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीक विमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही रक्कम मिळाली आहे, अशी माहिती कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना काढून २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याबाबत पीक विमा कंपनीला आदेश दिला होता. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा देखील केला. ओरिएंटल विमा कंपनीकडून मका, सोयाबीन व बाजरी पिकासाठी २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाला आहे.

Web Title: Solapur Insurance amount of Rs 113 crore deposited in the account of one lakh 90 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.