सोलापूरचा जवान मध्यप्रदेशमध्ये शहीद
By admin | Published: March 31, 2017 07:55 PM2017-03-31T19:55:33+5:302017-03-31T19:55:33+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला : बबिना (मध्यप्रदेश)येथे युध्दजन्य परिस्थितीचा सराव करताना लक्ष्मीनगर(ता.सांगोला)येथील भोजलिंग मोहन काळेल-25 हा जवान गुरुवारी रात्रौ साडेनऊ च्या सुमारास शहीद झाला आहे. त्याच्यावर शनिवार 1 एप्रिल रोजी स.11 वा.शासकीय इतमामात त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनील गोडबोले यांनी दिली आहे.
शहीद जवान भोजलिंग काळेल याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन बहिणी, असा परिवार आहे. जवान भोजलिंग काळेल याचा अवघ्या चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. त्याच्या शहीद होण्यामुळे लक्ष्मीनगर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान अंत्यविधीसाठी प्रशासनाने गावातील जागा निश्चित करण्यासाठी गाव कामगार तलाठ्यांना गावात पाचारण केले आहे. अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाच्या वतीने अधिकारी वर्ग उपस्थित राहणार असल्याचे तहसिलदार संजय पाटील, पो.नि.हारुण शेख यांनी सांगितले.
लक्ष्मीनगर येथील भोजलिंग मोहन काळेल हा युवक तीन वषार्पूर्वी 69 वी रणगाडा रेजिमेंट पंजाब मध्ये भरती झाला होता. मागील तीन वषार्पासून तो या रेजिमेंट मध्ये कार्यरत आहे. सध्या तो मध्यप्रदेश (बबिना)येथे युध्दजन्य परिस्थितीचा सराव करीत होता. गुरुवारी रात्रौ साडेनऊच्या सुमारास युध्दजन्य परिस्थितीचा सराव करताना शहीद झाला. बबिना येथून अधिका?्यांनी भोजलिंग शहीद झाल्याची दु:खद बातमी वडील मोहन काळेल यांना दुरध्वनी वरुन कळविली. आपला मुलगा शहीद झाल्याचे समजताच त्यांच्या कुटूंबीयांना आश्रु आनावर झाले. या दु:खद घटनेची बातमी लक्ष्मीनगर गावात समजताच सर्वांनी भोजलिंग काळेल याच्या घराकडे धाव घेत सहभागी झाले. जवान भोजलिंग काळेल याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाख्याची असून त्याचे आई, वडील मोलमजूरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. भोजलिंगच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबीयाचा आधार गेल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान जवान भोजलिंग काळेल याचे पार्थिव शुक्रवारी रात्रौ 7 वा.बबिना येथून शववाहिकेतून शनिवारी सकाळी 11 वा.पर्यंत लक्ष्मीनगर येथे आणण्यात येणार असून त्यांच्यासमवेत रणगाडा रेजिमेंटचे अधिकारीही असणार आहेत. भोजलिंग काळेल यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने अंत्यसंस्काराची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. अहमदनगर येथून सैनिक व सोलापूर येथून पोलीसांचे पथक भोजलिंगला मानवंदना देण्यासाठी येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनील गोडबोले यांनी सांगितले.