Solapur: सांगोल्याजवळ टायर फुटल्याने जीपचा अपघात; तीन महिला मजूर ठार, नऊ जण जखमी
By Appasaheb.patil | Updated: May 11, 2024 16:32 IST2024-05-11T15:17:25+5:302024-05-11T16:32:32+5:30
Solapur Accident News: भरधाव वेगात जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने तीन महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. याच अपघातात जीपमधील नऊ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सांगोला ते जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली.

Solapur: सांगोल्याजवळ टायर फुटल्याने जीपचा अपघात; तीन महिला मजूर ठार, नऊ जण जखमी
अरूण लिगाडे
सांगोला - भरधाव वेगात जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने तीन महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. याच अपघातात जीपमधील नऊ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सांगोला ते जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली.
दरम्यान, आज सकाळी बेळगांव जिल्ह्यातील अथणी येथील चौदा महिला या पंढरपूर तालुक्यातील पाचेगाव येथील द्राक्ष बागेत काम करण्यासाठी जात होत्या. दरम्यान, जत ते सांगोला रोडवर जीपच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक फुटल्याने जीप पलटी झाली. पलटी झाल्याने जीपमधील महिला या बाहेर फेकल्या गेल्या. त्यामुळे तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजला हलविले आहे. मृत व जखमी महिला या बेळगांव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळोग्री व ममलाद या दोन गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच सांगोला तालुका पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मोठी मदत केली.