Solapur: दरोडेखोरांना शोधताना गोव्यावरुन येणारी जीप पकडली, पोलिसांवर दारूच्या बाटल्या फेकून पळणारे तिघे ताब्यात

By काशिनाथ वाघमारे | Published: June 4, 2023 11:29 PM2023-06-04T23:29:19+5:302023-06-04T23:29:56+5:30

police: सांगली येथील रिलाईन्स ज्वेलरीमध्ये आठ दरोडेखोरांनी कर्मचार्यांचे हात बांधून दागिने लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने पलायन केले.

Solapur: Jeep coming from Goa caught while searching for robbers, three arrested after throwing liquor bottles at police | Solapur: दरोडेखोरांना शोधताना गोव्यावरुन येणारी जीप पकडली, पोलिसांवर दारूच्या बाटल्या फेकून पळणारे तिघे ताब्यात

Solapur: दरोडेखोरांना शोधताना गोव्यावरुन येणारी जीप पकडली, पोलिसांवर दारूच्या बाटल्या फेकून पळणारे तिघे ताब्यात

googlenewsNext

- काशिनाथ वाघमारे 

सोलापूर  : सांगली येथील रिलाईन्स ज्वेलरीमध्ये आठ दरोडेखोरांनी कर्मचार्यांचे हात बांधून दागिने लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने पलायन केले. दरम्यान स्वत: पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी ग्रामीण यंत्रणेवरुन नागरिकांना याबाबत कॉल करुन त्या गाडीचे वर्णन सांगत दरोडेखोरांना पकडण्याचे आवाहन केले होते. ते स्वत:ही सांगोला नाक्यावर थांबून वाहनांची तपासणी करीत असताना दरोडेखोरांचे वाहन सापडण्याऐवजी गोव्यावरुन ३० बॉक्स दारु घेवून जाणारे वाहन पोलीसांना मिळाले. यावेळी आरोपींनी दारुच्या बाटल्या पोलिसांच्या अंगावर टाकून पळाले आणि पोलिसांच्या ताब्यातही आले.

रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मंगळवेढ्यात सांगोला नाक्यावर ही कारवाई झाली. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सांगलीतील रिलाईन्स ज्वेलरी ८ आरोपीने लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने (एम.एच.०७ / क्यू. ५५९९) जीपमधून निघाले. याची माहिती पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी कॉल करुन महामार्गावरील नागरिकांना गाडीचे वर्णन देवून गाडी पकडण्याचे आवाहन केले होते.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड,गुन्हे अन्वेशन विभागाचे सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक पोटे व त्यांची टीम मंगळवेढ्याचे सहायक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे, पोलीस हवालदार श्रीमंत पवार, हजरत पठाण, युवराज वाघमारे, अस्लम काझी, सचिन वाघ,शिवाजी पवार यांचे पथक शहर महामार्गावर सांगोला नाका येथे बॅरीगेट लावून वाहन तपासणी मोहीम सुरू केली.

प्रत्येक वाहनाची तपासणी सुरु रविवारी सायंकाळी  गोव्यावरुन दारु घेवून येणारे वाहन पोलीसांच्या गराड्यात सापडले. हे वाहन सांगोला येथे पोलीसांनी नाक्यावर पाहिल्यानंतर टोलवरील बॅरीगेट तोडून फरार झाले. पोलीस त्यांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी दारुच्या बाटल्या फेकून मारण्याचा प्रकार केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगीतले.

चडचणमध्ये निघाली होती दारू 
मंगळवेढ्यात ही गाडी पकडल्यानंतर यातील आरोपी स्वप्निल कोसेकर, शहाजी गायकवाड, असिफ मुजावर (सर्व रा.मोहोळ) यांना ताब्यात घेतले. ही दारु चडचण येथे विक्रीस जाणार असल्याचे चौकशीत आरोपीने सांगितले. पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिकारी सध्या दरोडेखोरांच्या मागावर असून महामार्गावरील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासताहेत.

Web Title: Solapur: Jeep coming from Goa caught while searching for robbers, three arrested after throwing liquor bottles at police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.