सोलापूरकर रोज पितात सहा हजार लिटर मस्तानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:42 PM2019-03-15T12:42:11+5:302019-03-15T12:43:41+5:30
संतोष आचलारे सोलापूर : कडक उन्हाने त्रस्त झालेल्या सोलापूरकरांची पावले दुपारच्या व सायंकाळच्या वेळी आपसूकच थंड पेय घेण्यासाठी वळत ...
संतोष आचलारे
सोलापूर : कडक उन्हाने त्रस्त झालेल्या सोलापूरकरांची पावले दुपारच्या व सायंकाळच्या वेळी आपसूकच थंड पेय घेण्यासाठी वळत आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी ग्राहकांची ही पेय पिण्यासाठी गर्दी होते. दररोज १०० हातगाड्यांतून जवळपास सहा हजार लिटर मस्तानीची विक्री होते. यासाठी ज्यूसलाच यंदाही ग्राहकांची पहिली पसंती दिसून येत आहे. त्यानंतर पायनापल, अॅपल व चिकू ज्यूसला पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढत आहे. मार्च महिन्यात गुरुवारी सर्वाधिक उन्हाचा पारा वाढल्याने सोलापुरातील नागरिक ज्यूस सेंटर व कोल्ड्रिंक सेंटरकडे जाताना दिसून येत होते. सात रस्ता, पार्क चौक, जुळे सोलापूर, विजापूर रोड, कोंतम चौक, टिळक चौक, अशोक चौक आदी परिसरातील ज्युस सेंटरवर येणाºया ग्राहकांची संख्या वाढताना दिसून येत होती.
रस्त्यावरील हातगाडीवर वीस रुपये ग्लास याप्रमाणे पायनापल, लिंबू सरबत, रोज, सोडा आदी प्रकारचे पेय विकले जात आहे. स्वस्त पर्याय म्हणून या हातगाड्यांच्या भोवती ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
लिंबू सरबत व मस्तानी या दोन प्रकारच्या पेयांना या ठिकाणी सर्वाधिक पसंती मिळत असल्याची माहिती सात रस्ता येथील विक्रेत्याने दिली.
उन्हाचा पारा वाढल्याने गल्लोगल्ली ज्यूस सेंटर थाटत असल्याचे दिसून येत आहे. चिकू, पायनापल, आॅरेंज, अॅपल, डाळिंब, मोसंबी आदी प्रकारच्या ज्यूसबरोबरच आईस्क्रीमची विक्री होत आहे. मावा, फालुदा यासारख्या आईस्क्रीमलाही ग्राहकांची पसंती दिसून येत आहे.
दुकानात थाटलेल्या ज्यूसचा व आईस्क्रीमचा दर मात्र तीस रुपयांच्या पुढे असल्याने या ठिकाणी विशिष्ट ग्राहकांचीच गर्दी होताना दिसून येत आहे. जोडप्यांची उपस्थिती अशा दुकानात दिसून येत आहे.
बर्फाशिवाय असणाºया थंड पेयांनाही पसंती
- - बर्फ घालून करण्यात येणाºया शीतपेयांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असल्याने अनेक ग्राहकांची बर्फाव्यतिरिक्त असणाºया अन्य थंडपेयांना पसंती मिळत आहे.
- - बर्फामुळे घसा धरणे, सर्दी होणे असे प्रकार होत असल्याने बर्फ न घालता थंड असलेल्या अन्य शीतपेयांना पसंती मिळत असल्याची माहिती कोंतम चौक येथील एका ज्यूस सेंटर चालकाने दिली.
- - आईस्क्रीम व कोल्ड्रिंकला अशा ग्राहकांची पसंती असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रसवंती अजूनही ओसच
- - उन्हाळा म्हटला की बर्फ घालून तयार केलेला थंडगार उसाचा रस सर्वांनाच आठवतो. थंडगार उसाच्या रसाची मागणी काही वर्षांपासून कमी होताना दिसून येत आहे.
- - उन्हाळ्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही रसवंतीगृह अनेक विक्रेत्यांनी थाटले आहे, मात्र या रसवंतीच्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी मात्र तुरळक दिसून येत आहे.