लाड-पागे शिफारशीच्या नोकरभरतीची स्थगिती उठवली! महाराष्ट्र राज्य मनपा, नपा फेडरेशन संघटनेच्या पाठपुराव्याला यश
By संताजी शिंदे | Published: June 25, 2024 07:55 PM2024-06-25T19:55:40+5:302024-06-25T19:55:58+5:30
Solapur News: लाड-पागेच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या पाल्यास, नोकर भरती करण्याच्या प्रक्रीयेला देण्यात आलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे. महाराष्ट्र राज्य मनपा, नगरपालिका संघटना फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
- संताजी शिंदे
सोलापूर - लाड-पागेच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या पाल्यास, नोकर भरती करण्याच्या प्रक्रीयेला देण्यात आलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे. महाराष्ट्र राज्य मनपा, नगरपालिका संघटना फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
औरंगाबाद खंडपीठाने २३ मार्च २०२३ रोजी लाडपागे अंतर्गत पाल्यांच्या नोकर भरतीला स्थगिती दिली होती. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये हजारो कर्मचारी लाडपागे नोकरी पासून वंचित राहिले होते. स्थगितीच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन संघटनेने १० ऑगस्टमध्ये २०२३ रोजी मुंबई युनियन कार्यालय या ठिकाणी बैठक घेतली होती. बैठकीत सुरेश ठाकूर, बबनराव झिंजुर्डे, प्रवक्ते ॲड. गौतम खरात, संतोष पवार, अनिल जाधव, गणेश शिंगे, बापूसाहेब सदाफुले व महाराष्ट्रातील मनपाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यास ठराव पास केला होता.
स्थगिती दिल्यापासून आजतागायत सर्व पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये सातत्याने पाठपुरावा केला. २४ जून २०२४ रोजी लाड-पागे शिफारीनुसार एस.सी. प्रवर्गातील नव बौद्ध महार, मातंग या समाजातील वारसदारांना न्याय मिळवून दिला. न्यायमूर्तींनी अनुसूचित जाती मधील सर्व जातीच्या कामगाराना लाड व पागे कमिटीनुसार असलेल्या वारस नोकरीच्या लाभाबाबत असलेली स्थगिती उठवलेली आहे, मात्र उर्वरित खुला प्रवर्गया निकालामुळे अंशतः न्याय मिळालेला आहे परंतु उर्वरित खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील सफाई कामगार यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.या निकालामुळे अंशतः न्याय मिळालेला आहे परंतु उर्वरित खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील सफाई कामगार यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. व इतर मागास प्रवर्गातील कामगार यांना लागू असलेली स्थगिती कायम ठेवलेली आहे.
माझ्या २९० कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला - बापू सदाफुले
मागासवर्गीयांमध्ये सध्या एकच हक्काची नोकरी राहिली आहे. स्थगिती मिळाल्याने मेहतर व भंगी या दोन जाती वगळता इतर जातीमधील वारसाहक्काच्या कर्मचाऱ्यांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यांना मोल मजूरीशिवाय पर्याय राहिला नव्हता, आम्ही सातत्याने औरंगाबाद खंडपिठात पाठ पुरावा केला. अखेर दहा महिन्यानंतर खंडपिठाने नोकरभरतीवरील स्थगिती उठवली आहे. यामुळे महानगरपालिकेतील माझ्या २९० न्याय मिळाला असल्याची भावना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापू सदाफुले यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.