दुसऱ्या फेरीत अखेर प्रणिती शिंदे १७ हजार मतांनी आघाडीवर; भाजपचे राम सातपुते पिछाडीवर
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: June 4, 2024 09:56 IST2024-06-04T09:50:38+5:302024-06-04T09:56:32+5:30
Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे एकूण १७ हजार २५६ मतांनी आघाडीवर आहेत.

दुसऱ्या फेरीत अखेर प्रणिती शिंदे १७ हजार मतांनी आघाडीवर; भाजपचे राम सातपुते पिछाडीवर
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे एकूण १७ हजार २५६ मतांनी आघाडीवर आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली साडेनऊ पर्यंत दुसरी फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे यांनी ६ हजार ६६१ तर दुसऱ्या फेरीत प्रणिती शिंदे यांनी ११ हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आहे.
टपाली मतदानात सुद्धा प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. सध्या तिसरी व चौथी फेरी सुरू असून अर्ध्या तासात तिसऱ्या व चौथ्या फेरीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते हे सोलापूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.