EVM मध्ये बिघाड, सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी घटली
By Appasaheb.patil | Published: April 18, 2019 11:30 AM2019-04-18T11:30:28+5:302019-04-18T11:34:45+5:30
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी १० वाजेपर्यंत ५. ६५ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. दरम्यान सकाळच्या सत्रात सोलापूर शहर, अक्कलकोट तालुका, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांश गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाली़ यामुळे सकाळच्या सत्रातील मतदान टक्केवारीत मोठी घट झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात ५. ६५ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून जयसिध्देश्वर महास्वामी तर वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासह १३ जण निवडणुक रिंगणात आहेत. सकाळच्या सत्रात सोलापुरातील कुमठा नाका, मंद्रुप येथील सेवालाल नगर, उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव, आचेगांव, पंजाब तालीम सोलापूर महापालिका उर्दू शाळा क्र. २ यासह आदी शहरातील बहुतांश व ग्रामीण भागातील गावातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाची टक्केवारी घटली आहे़ मात्र दहानंतर बºयाच केंद्रावरील मतदान यंत्र सुरू करण्यात आले़ सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा पहावयास मिळत आहे.
शहरातील बहुतांश मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद असल्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांनी निवडणूक निर्णय अधिकार्याकडे वेळ वाढवून मिळण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे़ याशिवाय काँग्रेसकडूनही मतदान यंत्र बिघाडबाबत निवडणुक निर्णय अधिकाºयांकडे तक्रार करण्यात आली आहे.