बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ
By appasaheb.patil | Published: April 18, 2019 10:51 AM2019-04-18T10:51:50+5:302019-04-18T11:48:25+5:30
बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
सोलापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येणाºया बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक २१४ मधील मतदान यंत्र सुरूच न झाल्याने सकाळी सात ते आठ एक तास मतदान सुरूच झाले नाही. यामुळे सकाळी मतदान करून कामाला जाणाºया लोकांची गैरसोय झाली. मतदान यंत्रात बिघाड झालेल्या गोंधळामुळे मतदान केंद्रावर गर्दी झाली होती.
याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पवार यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील, तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्याशी याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोनच उचलला नाही. याचबरोबरच गावात कोतवाल यांनी मतदान स्लीप वाटप केले नसल्याचे पवार व गावकºयांनी सांगितले. सकाळी आठ वाजता याठिकाणी सुरळीतपणे मतदान सुरू झाले. याठिकाणी मतदान यंत्र बदलण्यात आले.
बार्शीत पहिल्या दोन तासात तालुक्यात १२ हजार ६०७ पुरुष तर ४ हजार ८८ महिला असे एकूण १६ हजार ६९५ (५.५४ टक्के) मतदान झाले. बार्शी तालुक्यात ३ लाख १ हजार १५६ एवढे मतदान आहे.
------------
वानेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार
बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे सकाळी दहावाजेपर्यंत येथील मतदान केंद्रावर एकही मतदान झाले नाही़