सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ ; सुशीलकुमार शिंदे ८१ हजार मतांनी पिछाडीवर
By appasaheb.patil | Published: May 23, 2019 02:37 PM2019-05-23T14:37:15+5:302019-05-23T14:38:51+5:30
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा काँग्रेसला जबर फटका बसल्याचे चित्र आतापर्यंत झालेल्या मतमोजणीवरुन दिसून येत आहे
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तब्बल ८० हजार मतांनी पिछाडीवर असून भाजपच्या डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ८५ हजारांहून अधिक मते खेचली आहेत. दुपारी अडीच वाजेपर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरून भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी याना २ लाख ७८ हजार १७४, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे याना १ लाख ९७ हजार २८३ तर वंचित बहुजन आघाडीचे अॅड़ प्रकाश आंबेडकर यांना ९१४५७ हजार ८९१ मते मिळाली आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस सकाळी पोस्टल मतमोजणीने प्रारंभ झाला. पोस्टल मतमोजणीतही भाजपच्या डॉ. जयसिध्देश्वर महाराजांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी मतांची आघाडी कायम ठेवल्याचे चित्र आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा काँग्रेसला जबर फटका बसल्याचे चित्र आतापर्यंत झालेल्या मतमोजणीवरुन दिसून येत आहे. दुुपारी २ वाजून ३० मिनिटापर्यंत १२ फेºयांची मतमोजणी झाली होती. त्यामध्ये भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांना २ लाख ६० हजार ५९५, तर सुशीलकुमार शिंदे यांना १ लाख ९७ हजार २८३ आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांना ९१ हजार ४५७ मते मिळाली होती.