सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:59 AM2019-05-23T11:59:03+5:302019-05-23T12:02:40+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतली आहे.

Solapur Loksabha Election Results 2019: BJP's Jaisindeeshwar Mahaswamy is leading by 48 thousand votes | सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर

सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्दे- अक्कलकोट, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपला सर्वाधिक मते- मोहोळ, उत्तर व दक्षिण मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदेंना मिळाली जास्तीचे मते- फेरीनिहाय निकाल हाती देण्यास निवडणुक प्रशासन सज्ज

सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेनं सोलापूर मतदारसंघात भाजपने काँग्रेसची पार वाट लावली होती. भाजपचे शरद बनसोडे यांनी यांनी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे याचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यापुढे काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे याच्या रूपानं  भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. यंदा भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली आहे़ त्यामुळे इथल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १ लाख ६५ हजार १०२  मतं मिळाली असून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्या पारड्यात १ लाख १७ हजार २४६ मतं पडली आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निकालाचे अपडेट निवडणुक निर्णय अधिकाºयांकडून वेळेत देण्यात येत आहे़ जसेजसे आकडे बाहेर येतील तशीतशी उमेदवारांची धाकधुक वाढत आहे़    



 

Web Title: Solapur Loksabha Election Results 2019: BJP's Jaisindeeshwar Mahaswamy is leading by 48 thousand votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.