सोलापूर, माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे उमेदवार आघाडीवर

By appasaheb.patil | Published: May 23, 2019 11:15 AM2019-05-23T11:15:12+5:302019-05-23T11:22:50+5:30

Solapur and Madha Lok Sabha Election Results 2019

Solapur, Madha Lok Sabha Elections 2019: BJP candidates are in the forefront | सोलापूर, माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे उमेदवार आघाडीवर

सोलापूर, माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे उमेदवार आघाडीवर

Next
ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघात जयसिद्धेश्वर स्वामी भाजप यांना ९१ हजार ३६८ मते मिळालीतिस्पर्धी सुशीलकुमार शिंदे कॉंग्रेस यांना ७४ हजार ६७२ इतकी मते मिळाली वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २७ हजार ९६१ इतकी मते मिळाली

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर सुरूच असून भाजपाचे रणजितसिंह हिंदुराव नाईक- निंबाळकर यांना ९८ हजार २५८ मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांना ९५ हजार ४३९ मते मिळाली आहेत़ आतापर्यंत एकूण २ लाख १७ हजार २९३ मत मोजून झाली आहेत.  सद्यस्थितीत जवळपास २ हजार ८१९ मतांनी भाजपचे निंबाळकर आघाडीवर आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात जयसिद्धेश्वर स्वामी भाजप यांना ९१ हजार ३६८ मते मिळाली आहेत तर प्रतिस्पर्धी सुशीलकुमार शिंदे कॉंग्रेस यांना ७४ हजार ६७२ इतकी मते मिळाली आहेत. वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २७ हजार ९६१ इतकी मते मिळाली आहेत. या मतदारसंघात १ लाख ९८ हजार ७७० इतकी किंमत मोजून झाली आहेत. जवळपास २७ हजार ९१४ मतांनी जयसिद्धेश्वर महास्वामी आघाडीवर आहेत.

देशात सद्यस्थितीत ५४२ जागांचा कल स्पष्ट झाला असून ३३१ जागांवर भाजप आघाडी ९९ जागांवर काँग्रेस तर इतर ११२ जागांवर आघाडीवर आहेत़ महाराष्ट्रात ४८ जागांचा कल स्पष्ट झाला असून भाजपा २४ शिवसेना २० राष्ट्रवादी ३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस कुठेही आघाडीवर नाही हीच स्थिती वंचित ची ही असल्याचं सांगण्यात आले आहे़ 

Web Title: Solapur, Madha Lok Sabha Elections 2019: BJP candidates are in the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.