सोलापूर, माढा लोकसभा निवडणुक; मतदान कार्ड घेऊन कर्मचारी मतदाराच्या दारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:31 AM2019-03-16T11:31:48+5:302019-03-16T11:32:56+5:30

सोलापूर : मागील वर्षभरापासून नव्या मतदारासाठी राबविलेल्या प्रक्रियेतून नोंदी झालेल्या बहुतांश मतदारांचे कार्ड तहसील कार्यालयात जमा झाले आहेत़ यादीनुसार ...

Solapur, Madha Lok Sabha elections; Employee voter door with voting card | सोलापूर, माढा लोकसभा निवडणुक; मतदान कार्ड घेऊन कर्मचारी मतदाराच्या दारावर

सोलापूर, माढा लोकसभा निवडणुक; मतदान कार्ड घेऊन कर्मचारी मतदाराच्या दारावर

Next
ठळक मुद्दे मागील वर्षभरापासून नव्या मतदारासाठी राबविलेल्या प्रक्रियेतून नोंदी झालेल्या बहुतांश मतदारांचे कार्ड तहसील कार्यालयात जमायादीनुसार कार्डची वॉर्डनिहाय वर्गवारी करण्याच्या कामात यंत्रणा लागली तर दुसरीकडे बीएलओ हे कार्ड घेऊन मतदाराच्या दारावर जाऊन वाटताहेत

सोलापूर : मागील वर्षभरापासून नव्या मतदारासाठी राबविलेल्या प्रक्रियेतून नोंदी झालेल्या बहुतांश मतदारांचे कार्ड तहसील कार्यालयात जमा झाले आहेत़ यादीनुसार कार्डची वॉर्डनिहाय वर्गवारी करण्याच्या कामात यंत्रणा लागली तर दुसरीकडे बीएलओ हे कार्ड घेऊन मतदाराच्या दारावर जाऊन वाटताहेत. याचदरम्यान अर्थात ‘मार्च हीट’ दरम्यान दुबार नावे दोन दिवसांत कमी करण्याबाबत काढलेल्या फतव्याने यंत्रणेला आणखी घाम फोडला आहे.

जिल्ह्यात लोकसभेचे राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे यंत्रणा निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे़ एकट्या उत्तर तहसील कार्यालयात डोकावले असता पूर्ण यंत्रणा निवडणुकीच्या कामात लागल्याचे दिसून आले़ एक पर्यवेक्षकाचे ४० बीएलओवर नियंत्रण आहे.

 जिल्ह्यात बहुतांश तहसील कार्यालयातून बीएओंना गुरुवारी कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बीएलओ मतदाराची यादी आणि मतदान कार्ड घेऊन मतदाराच्या दारापर्यंत जातोय़ मतदार किंवा त्याचे घर सापडले नाही तर मोबाईलवर संपर्क साधून हे कार्ड वाटप करावे लागत आहेत़ यानंतर मतदारांना मतपत्रिका (स्लिपा) देण्यासाठी दुसºयांदा मतदारांच्या घरी जावे लागणार आहे़ ७०० ते १००० मतदारांमागे एका बीएलओची नियुक्ती करण्यात आली आहे़ याचदरम्यान यादीतील दुबार मतदारांची नावे कमी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

Web Title: Solapur, Madha Lok Sabha elections; Employee voter door with voting card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.