सोलापूर, माढा लोकसभेसाठी दोन प्रमुख अधिकाºयांसह तीस हजार कर्मचारी निवडणुकीमध्ये गुंतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:38 PM2019-03-18T12:38:21+5:302019-03-18T12:41:57+5:30
सोलापूर : सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन निवडणूक निर्णय अधिकारी, बारा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ...
सोलापूर : सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन निवडणूक निर्णय अधिकारी, बारा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तर तीस हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान घेण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या मतदारसंघात येणाºया सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी व उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. भूसंपादन उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. प्रांताधिकारी शिवाजी जगताप हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. पुनर्वसन खात्याच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. प्रांताधिकारी ज्योती पाटील या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले हे पंढरपूरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाकरिता अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या मतदारसंघातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी किशोर माळी यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माढा विधानसभा मतदारसंघाकरिता प्रांताधिकारी ज्योती कदम यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघाकरिता प्रांताधिकारी शमा पवार यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फलटण विधानसभा मतदारसंघासाठी प्रांताधिकारी संतोष जाधव यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माण विधानसभा मतदारसंघाकरिता प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन्ही मतदारसंघाकरिता ३ हजार ५६३ मतदान केंद्रे
- सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात एकूण ३ हजार ५६३ मतदान केंदे्र असणार आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार मतदान केंद्राची संख्या अशी आहे - करमाळा :३३४, माढा : ३४३, बार्शी : ३२६, मोहोळ : ३३१, सोलापूर शहर उत्तर : २७९, सोलापूर शहर मध्य : ३0३, अक्कलकोट : ३५९, दक्षिण सोलापूर : ३२३, पंढरपूर : ३३१, सांगोला : २९६,माळशिरस :३३८