एचआयव्ही बाधित जोडप्यांचा सोलापुरात विवाह; संकल्प युथ फाउंडेशनचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:27 PM2020-02-15T12:27:36+5:302020-02-15T12:29:40+5:30
या विवाहामुळे मेळाव्यास आलेल्यांनाही बाधितांनाही मिळाली प्रेरणा
सोलापूर : आपल्या लग्नात वºहाडी असावेत, हळद लागावी, साखरपुडा व्हावा, जोडवी, मंगळसूत्र, कपडे तसेच संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून मिळावे अशी स्वप्नं प्रत्येक नववधूची असतात. एचआयव्हीसंसर्गित मुलीला देखील आपले लग्न अशाच पद्धतीने व्हावे असे वाटत होते. पण ही इच्छा पूर्ण होईल का अशा विचारात असताना संकल्प युथ फाउंडेशनने याला साथ देत मुलीची इच्छा पूर्ण केली.
बाधित वधू-वरांचे विवाह होताना अडचणी येतात. विवाह झालाच तरी साध्या पद्धतीने होतो. काही मोजकीच व्यक्ती या विवाहाला असतात. यामुळे म्हणावा तसा उत्साह दिसत नाही; मात्र आपणही इतरांसारखेच आहोत. मग माझा विवाह इतरांसारखाच व्हावा अशी अपेक्षा वधूने केली होती. त्याला साथ देत व्हॅलेंटाईन डे या प्रेमाच्या दिवशीच त्यांचा अत्यंत थाटामाटात विवाह लावून देण्यात आला.
लग्नाचा हॉल फुले आणि फुग्यांनी सजविण्यात आला होता. सुग्रास जेवण तयार करण्यात आले होते. साखरपुडा करण्यात आला. हळद लावण्यात आली. फोटोही काढण्यात आले. मुलाला सफारी कपडे, बूट घेण्यात आले होते. तर मुलीला हळदीची साडी, लग्नातील साडी, बिचवे, जोडवी, मंगळसूत्र, पंैजण आदी भेट देण्यात आले. लग्नानंतर वधू-वरांच्या पालकांच्या डोळ््यात आनंद पाहायला मिळाला. विवाह करणारे जोडपे हे एकमेकांना ओळखत होते. संकल्प युथ फाउंडेशनने त्यांना एकत्र आणत विवाहाची जबाबदारी स्वीकारली. व्हॅलेंटाईन डे दिवशी त्यांचा विवाह तर केलाच त्याच दिवशी बाधितांचा स्नेहमेळावाही घेण्यात आला. या विवाहामुळे मेळाव्यास आलेल्यांनाही प्रेरणा मिळाली. आपला विवाह हा थाटामाटात व्हावा अशी इच्छाही पूर्ण झाली. या विवाहाला दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी संमती दिली.
परराज्यातील वºहाडी
- या लग्न सोहळ्यासह बाधितांच्या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात या राज्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील विवाहेच्छुक वधू-वरांनी उपस्थिती लावली. वºहाडींच्या उपस्थितीत आपला विवाह व्हावा, त्यांचा आशीर्वाद मिळावा अशी इच्छा मेळाव्यामध्ये लग्न झालेल्या मुलीची होती. तिच्या या लग्नाला देशाच्या विविध भागातून आलेल्या वºहाडींनी आशीर्वाद देत तिची इच्छा पूर्ण केली. या मेळाव्यात ४० विवाहेच्छुक वर तर १२ विवाहेच्छुक वधूंची उपस्थिती लावली.