सोलापूर ; सहकारमंत्री, पालकमंत्री यांच्या घरासमोर मराठा समाजाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:48 PM2018-07-27T12:48:38+5:302018-07-27T12:52:13+5:30
Next
ठळक मुद्देसोलापूरातील मराठा समाज आक्रमकपोलीसांना मोठा पोलीस बंदोबस्तव्हीआयपी रोडवरील रस्ते पोलीसांनी केले बंद
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़
यावेळी पालकमंत्री व सहकारमंत्री यांनी त्वरीत राजीनामा देण्याची मागणी मराठा समाज बांधवांनी केली़ सहकारमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करताना आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करून सरकारविरूध्द घोषणाबाजी दिली़ यावेळी पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता़
यावेळी मराठा समाजाचे माऊली पवार, नगरसेवक अमोल शिंदे, विनोद भोसले, माजी उपमहापौर प्रविण डोंगरे आदी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते़