खासदार जयसिध्देश्वर महास्वामींच्या अडचणींत वाढ; फसवणुकीचा गुन्हा दाखल

By appasaheb.patil | Published: March 5, 2020 03:24 PM2020-03-05T15:24:34+5:302020-03-05T17:29:00+5:30

सरकारची फसवणूक केल्याचा ठपका; न्यायालयाच्या आदेशानंतर झाला गुन्हा दाखल

Solapur MP Jai Siddharshwar Mahaswami files case against | खासदार जयसिध्देश्वर महास्वामींच्या अडचणींत वाढ; फसवणुकीचा गुन्हा दाखल

खासदार जयसिध्देश्वर महास्वामींच्या अडचणींत वाढ; फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next

सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आणि आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देश्याने सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद शिवाचार्यांविरोधात करण्यात आली होती. 

अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी खासदारांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूरच्या सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासह अक्कलकोट/उमरगा तहसील कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------
काय आहे प्रकरण ?
जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. त्यानंतर जातपडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमातीसाठी असलेले लाभ घेतल्याच्या कारणावरुन अक्कलकोट आणि उमरगा तहसीलदारांना न्यायालयात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Solapur MP Jai Siddharshwar Mahaswami files case against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.