सोलापूर मनपाच्या 87 बस RTOनं केल्या रद्द

By Admin | Published: April 25, 2017 12:19 PM2017-04-25T12:19:15+5:302017-04-25T12:19:15+5:30

JNNURM या केंद्र शासनाच्या योजनेमधून सोलापूर महापालिकेने 200 बसेस घेण्याचे ठरले होते त्यापैकी 100 बसेस सोलापुरात दाखल झाल्या

Solapur municipal 87 bus RTO canceled | सोलापूर मनपाच्या 87 बस RTOनं केल्या रद्द

सोलापूर मनपाच्या 87 बस RTOनं केल्या रद्द

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 25 - JNNURM या केंद्र शासनाच्या योजनेमधून सोलापूर महापालिकेने 200 बसेस घेण्याचे ठरले होते त्यापैकी 100 बसेस सोलापुरात दाखल झाल्या. मात्र यापैकी एक बस जळाली आणि उर्वरित 99 बसपैकी 87 बसची नोंदणी सोलापूर आरटीओने रद्द केली आहे.  
 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. हा निर्णय महापालिका परिवहन उपक्रमाला मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे.
 
महापालिकेला 87 बसची नोंदणी रद्द केल्याचे लेखी पत्र आरटीओकढून देण्यात आले आहे, अशी माहितीही खरमाटे यांनी दिली. 
केंद्र शासनाच्या योजनेतून देशभरात सुमारे 14,000 बसेस महापालिकांना देण्यात आल्या आहेत. 
 
87 बसची नोंदणी रद्द झाल्याने संबंधित कंपनीला नुकसान सहन करावे लागणार आहे. तसंच महानगरपालिकेला कसलेच नुकसान होणार नाही कारण आता नवीन बस खरेदी करण्यासाठी परवानगी मनपाला मिळणार आहे.  दरम्यान, उर्वरित 12 बस चांगल्या असून त्यातही काही बिघाड आढळून आल्यास त्यावरही कारवाई करण्यात येईल, असे खरमाटे यांनी सांगितले. 
 
बसची नोंदणी रद्द का करण्यात आली?
महापालिकेने खरेदी केलेल्या बसच्या चेसी क्रॅक आहेत त्यामुळे अनेक बस गाड्या वापराविना पडून आहेत. या बसचा RTOनं तपासणी करुन अहवाल सादर केल्यानंतर त्यानंतर नोंदणी रद्दचा निर्णय घेण्यात आला.  
 
केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम ५५(३ )आणि कलम ५५ (५) अन्वये बसेसची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
 
ज्या गाड्या खरेदी केल्या त्यांची कागदपत्रे आरटीओला सादर करण्यासही मनपाला सांगितले आहे.            
           
याप्रकरणी मनपाला अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली असून यासाठी थेट परिवहन आयुक्तांकडे दाद मागावी लागणार आहे, अशी माहिती बजरंग खरमाटे यांनी दिली आहे. 
 
दरम्यान, 2015 मध्ये मनपाचे विरोधी पक्षनेते यांनी बसच्या चेसी खराब असल्याची तक्रार केली होती.
 

Web Title: Solapur municipal 87 bus RTO canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.