सोलापूरातील महापालिका अधिकाºयाने उकळले पाच हजार रुपये, महापौरांसमोरच आले प्रकरण उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 07:56 PM2018-09-12T19:56:08+5:302018-09-12T19:57:16+5:30
या प्रकरणाची चौकशी करून अधिकाºयावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले.
सोलापूर : फडकुले सभागृहासमोरील रस्त्यालगतच्या जागेत एका महिलेला ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी भूमी मालमत्ता विभागातील अधिकाºयाने पाच हजार रुपये उकळल्याचा प्रकार महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासमोर उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी करून अधिकाºयावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले.
महापौर शोभा बनशेट्टी यांना भेटण्यासाठी विडी घरकूल येथील महानंदा स्वामी आल्या होत्या. त्यांनी आपल्या हातातील कागद दाखवून अतिक्रमण हटाव विभागाने जप्त केलेली ज्यूस मशीन परत मिळवून देण्याबाबत विनंती केली. महापौर बनशेट्टी यांनी नेमका काय प्रकार घडला आहे, याची खातरजमा केली.
महानंदा स्वामी यांनी दिलेल्या माहितीवरून महापौर अवाक् झाल्या. ई-टॉयलेटशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी भूमी व मालमत्ता विभागातील अधिकारी आबासाहेब चव्हाण यांनी पाच हजार व शंभर रुपयांचा एक कोरा स्टॅँप घेतला. एका हजाराची दंडात्मक पावती करून त्यांना तेथे ज्यूस सेंटर सुरू करण्यास सांगितले. पण २५ आॅगस्ट रोजी अतिक्रमण हटाव पथकाने ज्यूस सेंटरमधील मशीन, इतर साहित्य जप्त केले. याबाबत आवश्यक तो दंड भरण्याची तयारी दाखविली तरी मशीन परत देण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असल्याची कैफियत महानंदा स्वामी यांनी मांडली. भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाºयाच्या धाडसाबद्दल महापौरांना आश्चर्य वाटले. अशाप्रकारे शहरात होत असलेल्या किती अतिक्रमण धारकांकडून पैसे उकळण्यात आले असतील याची चौकशी करावी, असे आदेश त्यांनी दिले.
महापौरांनी केली अधिकाºयांची खरडपट्टी
च्महापौर बनशेट्टी यांनी बºयाच अधिकाºयांची खरडपट्टी केली. जनसंपर्क अधिकारी विजय कांबळे हेही त्यातून सुटले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था स्थापना दिनी आयोजित कार्यक्रमात तुम्ही कोठे होता? पुण्यतिथी-जयंती अभिवादन कार्यक्रमाला तुमची हजेरी नसते. कार्यक्रमाचे नियोजन ढिसाळ आहे. पगार तुम्ही घेणार आणि तुमचे काम आम्ही करायचे का?, असा खडा सवालही त्यांनी केला.